हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

गिधाडे पुलावरुन महिलेची मुलासह आत्महत्या

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर : तालुक्यातील वाडी येथील रहिवासी महिलेने गिधाडे येथील तापी पुलावरुन दहा वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन नदीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना 16 जूनला दुपारी घडल्याचा संशय आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

योगिता रवींद्रसिंग गिरासे (वय 30) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचे माहेर शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील आहे. ती काही दिवसांपूर्वी मुलास सोबत घेऊन माहेरी गेली होती. 16 जूनला ती वाडी येथे सासरी परत जाण्यासाठी निघाली. परंतु ती सासरी पोहचलीच नाही. गिधाडे येथील पुलावरुन मायलेकांना उडी टाकतांना काहींनी पाहिले. ते घटनास्थळी धावून गेले. तेथे पुलावर एक बॅग पडली होती. बॅगमध्ये एका वहीवर तेजस राजपूत असे नाव असून मोबाईल नंबरही लिहिला होता. त्यावर संपर्क साधला असता योगिता आणि दहा वर्षीय तेजसची ओळख पटली. तिचे नातलग तातडीने घटनास्थळी पोहचले. नदीपात्रात उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरु होता. योगिताने इतके टोकाचे पाऊल का उचलले याबाबत माहिती मिळू शकली नाही.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!