क्राईम ब्लास्ट ब्यूरो
आईने सामान घेण्यासाठी पाठवलेल्या तीन बालकांचा नदीत बुडून मृत्यू झाला. धडगाव तालुक्यातील देवानंद नदीत ही घटना घडली.
मृतांमध्ये निलेश दिलवर पाडवी (वय 4), मेहेर दिलवर पाडवी (वय 5) आणि पार्वती अशोक पाडवी (वय 5) यांचा समावेश आहे.
राहत असलेल्या ठिकाणावरून दुसऱ्या पाड्यावरील दुकानात सामान घेण्यासाठी जात असताना नदी ओलांडताना ही घटना घडली. तिघेही मृत धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा येथील रहिवासी आहेत. 15 जूनला दुपारी आईने सांगितलेले सामान आणण्यासाठी ते दुसऱ्या पाड्यावरील किराणा दुकानात जात होते. देवानंद नदीत खोल खड्ड्यात बुडून तिघांचा मृत्यु झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.