‘महसूल आपल्या दारी’; दहिवद येथे समाधान शिबिर यशस्वी,८०० लाभार्थ्यांनी घेतला लाभ  //  आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला; तरुणावर कोयत्याने हल्ला  //  बोराडीत ग्रामदैवताच्या रथाला आग लावण्याचा प्रयत्न; ग्रामस्थांमध्ये संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी  //  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून शिरपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी १४.०८ कोटींचा निधी मंजूर  //  चांदसूर्या येथे अवैध मद्यनिर्मितीवर पोलिसांचा छापा; १.७७ लाखांचा साठा जप्त  //  आर.सी.पटेल उर्दू विद्यालयात सामाजिक समता सप्ताह उत्साहात  //  शिरपूर फर्स्टची 23 मेपासून तालुकाभर ‘जनसंघर्ष यात्रा’  //  कर्मवीर पूर्वभरती सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे घवघवीत यशपोलिस व सैन्य भरतीत ७ प्रशिक्षणार्थींची यशस्वी निवड  //  भरधाव दुचाकीची जोरदार धडक; युवकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी  //  हेल्मेटशिवाय कार्यालयात प्रवेशबंदी; धुळे पोलिस अधिक्षकांचा आदर्शवत निर्णय

‘महसूल आपल्या दारी’; दहिवद येथे समाधान शिबिर यशस्वी,८०० लाभार्थ्यांनी घेतला लाभ

शिरपूर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’चा पहिला टप्पा बुधवारी दहिवद (ता. शिरपूर) येथे उत्साहात पार पडला.
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते तसेच उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक व तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील, उपसभापती शेखर पाटील, तहसील कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी-कर्मचारी, दहिवद मंडळातील माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी व तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरात सेतू शाखेमार्फत उत्पन्न दाखले, अधिवास प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. संजय गांधी शाखेकडून मंजूर प्रकरणांची वाटपपत्रे देण्यात आली. पुरवठा विभागामार्फत नवीन व दुबार शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. बालविकास विभागाने बेबी किटचे वितरण केले, तर कृषी विभागाकडून ट्रॅक्टर अनुदान वाटप व माती परीक्षण अहवाल देण्यात आले. याशिवाय वनहक्क धारकांचे केवायसीही करण्यात आले.
शिबिरात सुमारे ८०० लाभार्थ्यांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला. विविध शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी नागरिकांनी विविध स्टॉलना भेट दिली.
प्रास्ताविकात तहसीलदार महेंद्र माळी यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ राबविण्यामागील उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी दहिवद मंडळातील विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी या शिबिरांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी दहिवद मंडळातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शासनाच्या या उपक्रमामुळे योजनांची माहिती व लाभ थेट गावपातळीवर मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!