आर.सी.पटेल उर्दू विद्यालयात सामाजिक समता सप्ताह उत्साहात  //  शिरपूर फर्स्टची 23 मेपासून तालुकाभर ‘जनसंघर्ष यात्रा’  //  कर्मवीर पूर्वभरती सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे घवघवीत यशपोलिस व सैन्य भरतीत ७ प्रशिक्षणार्थींची यशस्वी निवड  //  भरधाव दुचाकीची जोरदार धडक; युवकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी  //  हेल्मेटशिवाय कार्यालयात प्रवेशबंदी; धुळे पोलिस अधिक्षकांचा आदर्शवत निर्णय  //  तऱ्हाडीच्या आठवडे बाजारात अंधाराचे साम्राज्य; व्यापारी, ग्रामस्थांत संताप  //  शिरपूर तहसीलची प्रमाणपत्र सेवा ‘हायटेक’; फोटो आणि क्यूआर कोडसह नवे स्वरूप  //  एज्यूकेशन वर्ल्ड रँकिंगमध्ये आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाची राज्यात १४वी झेप  //  अश्विनी पावरा धुळे जिल्हा मुलींच्या क्रिकेट संघाची कर्णधार  //  शिवसंवाद कार्यक्रमासाठी जय्यत तयारी; शिरपूरात आढावा बैठक

आर.सी.पटेल उर्दू विद्यालयात सामाजिक समता सप्ताह उत्साहात

शिरपूर : शहरातील आर.सी. पटेल उर्दू विद्यालयात सामाजिक समता सप्ताह विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक डॉ. मुबिनोद्दीन शेख तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक डॉ. इफ्तेखार सैय्यद उपस्थित होते.
डॉ. इफ्तेखार सैय्यद यांनी संविधान उद्देशिकेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच काही विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित निबंधांचे वाचन करून त्यांच्या विचारांना अभिवादन केले.
डॉ. मुबिनोद्दीन शेख यांनी भारताचे संविधान तयार होण्यामागील प्रक्रिया आणि त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बजावलेली ऐतिहासिक भूमिका याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिरोज कुरेशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सादिक कुरेशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!