आर.सी.पटेल उर्दू विद्यालयात सामाजिक समता सप्ताह उत्साहात  //  शिरपूर फर्स्टची 23 मेपासून तालुकाभर ‘जनसंघर्ष यात्रा’  //  कर्मवीर पूर्वभरती सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे घवघवीत यशपोलिस व सैन्य भरतीत ७ प्रशिक्षणार्थींची यशस्वी निवड  //  भरधाव दुचाकीची जोरदार धडक; युवकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी  //  हेल्मेटशिवाय कार्यालयात प्रवेशबंदी; धुळे पोलिस अधिक्षकांचा आदर्शवत निर्णय  //  तऱ्हाडीच्या आठवडे बाजारात अंधाराचे साम्राज्य; व्यापारी, ग्रामस्थांत संताप  //  शिरपूर तहसीलची प्रमाणपत्र सेवा ‘हायटेक’; फोटो आणि क्यूआर कोडसह नवे स्वरूप  //  एज्यूकेशन वर्ल्ड रँकिंगमध्ये आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाची राज्यात १४वी झेप  //  अश्विनी पावरा धुळे जिल्हा मुलींच्या क्रिकेट संघाची कर्णधार  //  शिवसंवाद कार्यक्रमासाठी जय्यत तयारी; शिरपूरात आढावा बैठक

एज्यूकेशन वर्ल्ड रँकिंगमध्ये आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाची राज्यात १४वी झेप

शिरपूर : येथील आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाने ‘एज्यूकेशन वर्ल्ड रँकिंग २०२६-२७’मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रातील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये १४वे, तर राष्ट्रीय स्तरावर ८०वे स्थान पटकावले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधनाभिमुख वातावरण आणि उत्कृष्ट प्लेसमेंटच्या जोरावर ही कामगिरी केली आहे. महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी ही माहिती दिली.
‘एज्यूकेशन वर्ल्ड’ संस्थेतर्फे देशभरातील विद्यापीठे, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांचे विविध निकषांवर मूल्यमापन करून रँकिंग जाहीर केले जाते. यामध्ये नेतृत्व व प्रशासन गुणवत्ता, प्राध्यापकांची गुणवत्ता, अभ्यासक्रम व अध्यापन पद्धती, उद्योगसंवाद, संशोधन व नवोपक्रम, पायाभूत सुविधा, प्लेसमेंट आणि व्हॅल्यू फॉर मनी या निकषांचा समावेश असतो.
या सर्व निकषांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आर. सी. पटेल महाविद्यालयाने देशातील सर्वोत्तम खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये स्थान कायम राखले आहे. स्वायत्त अभ्यासक्रम रचना, अनुभवी प्राध्यापकवर्ग, अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन प्रकल्प, स्टार्टअप संस्कृती आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रम यामुळे संस्थेने सातत्याने शैक्षणिक गुणवत्ता उंचावली आहे.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, ट्रस्टी सौ. जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी तसेच सर्व संचालक, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!