‘महसूल आपल्या दारी’; दहिवद येथे समाधान शिबिर यशस्वी,८०० लाभार्थ्यांनी घेतला लाभ  //  आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला; तरुणावर कोयत्याने हल्ला  //  बोराडीत ग्रामदैवताच्या रथाला आग लावण्याचा प्रयत्न; ग्रामस्थांमध्ये संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी  //  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून शिरपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी १४.०८ कोटींचा निधी मंजूर  //  चांदसूर्या येथे अवैध मद्यनिर्मितीवर पोलिसांचा छापा; १.७७ लाखांचा साठा जप्त  //  आर.सी.पटेल उर्दू विद्यालयात सामाजिक समता सप्ताह उत्साहात  //  शिरपूर फर्स्टची 23 मेपासून तालुकाभर ‘जनसंघर्ष यात्रा’  //  कर्मवीर पूर्वभरती सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे घवघवीत यशपोलिस व सैन्य भरतीत ७ प्रशिक्षणार्थींची यशस्वी निवड  //  भरधाव दुचाकीची जोरदार धडक; युवकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी  //  हेल्मेटशिवाय कार्यालयात प्रवेशबंदी; धुळे पोलिस अधिक्षकांचा आदर्शवत निर्णय

आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला; तरुणावर कोयत्याने हल्ला

शिरपूर : शहरातील गणेश कॉलनी परिसरात किरकोळ वादातून एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी संशयिताविरुद्ध शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निलेश नारायण मराठे (वय २१, रा. प्लॉट नं. ५, गणेश कॉलनी, शिरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १९ मे २०२६ रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनी येथे संशयित प्रविण उर्फ दादू संजय मराठे (रा. गणेश कॉलनी, शिरपूर) यास आईला शिवीगाळ का करतो. याबाबत जाब विचारल्याचा राग आल्याने संशयिताने फिर्यादी व त्यांच्या आईला अश्लील शिवीगाळ केली.त्यानंतर संशयिताने निलेश मराठे यांना हाताबुक्यांनी मारहाण करत कोयत्याने डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ चेतन सोनवणे करीत आहेत.

IMG_20260521_10403839
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!