‘महसूल आपल्या दारी’; दहिवद येथे समाधान शिबिर यशस्वी,८०० लाभार्थ्यांनी घेतला लाभ  //  आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला; तरुणावर कोयत्याने हल्ला  //  बोराडीत ग्रामदैवताच्या रथाला आग लावण्याचा प्रयत्न; ग्रामस्थांमध्ये संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी  //  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून शिरपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी १४.०८ कोटींचा निधी मंजूर  //  चांदसूर्या येथे अवैध मद्यनिर्मितीवर पोलिसांचा छापा; १.७७ लाखांचा साठा जप्त  //  आर.सी.पटेल उर्दू विद्यालयात सामाजिक समता सप्ताह उत्साहात  //  शिरपूर फर्स्टची 23 मेपासून तालुकाभर ‘जनसंघर्ष यात्रा’  //  कर्मवीर पूर्वभरती सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे घवघवीत यशपोलिस व सैन्य भरतीत ७ प्रशिक्षणार्थींची यशस्वी निवड  //  भरधाव दुचाकीची जोरदार धडक; युवकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी  //  हेल्मेटशिवाय कार्यालयात प्रवेशबंदी; धुळे पोलिस अधिक्षकांचा आदर्शवत निर्णय

चांदसूर्या येथे अवैध मद्यनिर्मितीवर पोलिसांचा छापा; १.७७ लाखांचा साठा जप्त

IMG_20260427_23515148

शिरपूर (प्रतिनिधी): शिरपूर तालुक्यातील नवे चांदसूर्या गावात अवैध मद्यनिर्मितीचा मोठा पर्दाफाश करत शहर पोलिसांनी एका घरावर छापा टाकून तब्बल १ लाख ७७ हजार ७५० रुपयांचा मद्यसाठा व साहित्य जप्त केले. या कारवाईत एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना नवे चांदसूर्या येथे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर देशी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली १९ मे रोजी सायंकाळी छापेमारी करण्यात आली.
छाप्यात वासर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका घरातून २०० लिटर स्पिरीट भरलेली प्लास्टिक टाकी, ३५ लिटर स्पिरीटचा ड्रम, १६ हजार रिकाम्या प्लास्टिक बाटल्या तसेच खोकी असा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले.
या प्रकरणी नितेंद्र पोपटराव पावरा (वय ३८, रा. नवे चांदसूर्या) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध मद्यनिर्मितीच्या धंद्याला मोठा धक्का बसला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक कुशारे करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!