आर.सी.पटेल उर्दू विद्यालयात सामाजिक समता सप्ताह उत्साहात  //  शिरपूर फर्स्टची 23 मेपासून तालुकाभर ‘जनसंघर्ष यात्रा’  //  कर्मवीर पूर्वभरती सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे घवघवीत यशपोलिस व सैन्य भरतीत ७ प्रशिक्षणार्थींची यशस्वी निवड  //  भरधाव दुचाकीची जोरदार धडक; युवकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी  //  हेल्मेटशिवाय कार्यालयात प्रवेशबंदी; धुळे पोलिस अधिक्षकांचा आदर्शवत निर्णय  //  तऱ्हाडीच्या आठवडे बाजारात अंधाराचे साम्राज्य; व्यापारी, ग्रामस्थांत संताप  //  शिरपूर तहसीलची प्रमाणपत्र सेवा ‘हायटेक’; फोटो आणि क्यूआर कोडसह नवे स्वरूप  //  एज्यूकेशन वर्ल्ड रँकिंगमध्ये आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाची राज्यात १४वी झेप  //  अश्विनी पावरा धुळे जिल्हा मुलींच्या क्रिकेट संघाची कर्णधार  //  शिवसंवाद कार्यक्रमासाठी जय्यत तयारी; शिरपूरात आढावा बैठक

शिरपूर तहसीलची प्रमाणपत्र सेवा ‘हायटेक’; फोटो आणि क्यूआर कोडसह नवे स्वरूप

शिरपूर : नागरिकांना अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा देण्याच्या उद्देशाने शिरपूर तहसील कार्यालयाने विविध प्रमाणपत्रांच्या स्वरूपात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता तहसील कार्यालयाकडून देण्यात येणारी सर्व प्रमाणपत्रे अर्जदाराचा फोटो आणि क्यूआर कोडसह उपलब्ध होणार असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली या सेवेत, उत्पन्न, रहिवासी, नॉन-क्रीमी लेयर आदी प्रमाणपत्रांसाठी ही नवी प्रणाली लागू करण्यात आली आहे. प्रमाणपत्रावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यास संबंधित प्रमाणपत्राची तत्काळ ऑनलाइन पडताळणी करता येणार आहे. त्यामुळे शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था तसेच इतर संस्थांकडून प्रमाणपत्रांची पडताळणी अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.
प्रमाणपत्रावर अर्जदाराचा फोटो समाविष्ट केल्यामुळे गैरवापरास आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच अर्जदाराचा मोबाईल क्रमांक जोडल्याने अर्जाची सद्यस्थिती थेट मोबाईलवर कळणार असून नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.
तहसील कार्यालयाने नागरिकांना प्रमाणपत्रांसाठी अर्ज करताना आवश्यक माहिती अचूक भरून या नव्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे तहसीलदार महेंद्र माळी यांनी आवाहन केले आहे.

IMG_20260507_20333588
IMG_20260507_20333588

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!