आर.सी.पटेल उर्दू विद्यालयात सामाजिक समता सप्ताह उत्साहात  //  शिरपूर फर्स्टची 23 मेपासून तालुकाभर ‘जनसंघर्ष यात्रा’  //  कर्मवीर पूर्वभरती सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे घवघवीत यशपोलिस व सैन्य भरतीत ७ प्रशिक्षणार्थींची यशस्वी निवड  //  भरधाव दुचाकीची जोरदार धडक; युवकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी  //  हेल्मेटशिवाय कार्यालयात प्रवेशबंदी; धुळे पोलिस अधिक्षकांचा आदर्शवत निर्णय  //  तऱ्हाडीच्या आठवडे बाजारात अंधाराचे साम्राज्य; व्यापारी, ग्रामस्थांत संताप  //  शिरपूर तहसीलची प्रमाणपत्र सेवा ‘हायटेक’; फोटो आणि क्यूआर कोडसह नवे स्वरूप  //  एज्यूकेशन वर्ल्ड रँकिंगमध्ये आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाची राज्यात १४वी झेप  //  अश्विनी पावरा धुळे जिल्हा मुलींच्या क्रिकेट संघाची कर्णधार  //  शिवसंवाद कार्यक्रमासाठी जय्यत तयारी; शिरपूरात आढावा बैठक

शिवसंवाद कार्यक्रमासाठी जय्यत तयारी; शिरपूरात आढावा बैठक

शिरपूर (प्रतिनिधी) शिवसेनेच्या वतीने राज्यभर आयोजित करण्यात येत असलेल्या ‘शिवसंवाद’ अभियानांतर्गत खासदार श्रीकांत शिंदे हे २२ मे रोजी शिरपूर दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी १७ मे रोजी सायंकाळी शिरपूर येथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली.
या बैठकीत मतदार नोंदणी, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहिमेतील अडचणी, बूथस्तरीय अधिकाऱ्यांसोबत पक्षाचे प्रतिनिधी नियुक्त करणे आणि मतदार यादीत समर्थकांची नावे समाविष्ट करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तालुक्यात आतापर्यंत ३१ टक्के SIR पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. या प्रक्रियेसाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रत्येक गावात आणि शहरातील प्रत्येक प्रभागात शाखा सुरू कराव्यात, तसेच घराघरांत शिवसैनिक तयार करण्याचे आवाहन शिरीष चौधरी यांनी केले. भविष्यात पक्ष स्वबळावर निवडणुका लढविण्याच्या दृष्टीने तयारी करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीस धुळे जिल्हाप्रमुख सतीश महाले, महानगरप्रमुख संजय वाल्हे, तालुकाप्रमुख कन्हैया चौधरी,मनोज धनगर, हेमंत पाटील,वसंत पावरा,प्रसाद पाटील,राजू अण्णा गिरासे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!