अमरिशभाई पटेल पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रातून ५१ युवकांना शासकीय सेवेत संधी  //  लखा पाटील नगरात श्री राधा-कृष्ण मंदिराच्या पायाभरणीचा शुभारंभ  //  नंदुरबारात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आ. अमरिशभाई पटेल यांच्याकडून स्वागत  //  कृषी विभाग-पोलिसांची संयुक्त कारवाई;वाघाडी येथे एचटीबीटी बियाणे जप्त  //  भरड धान्य मोजणीसाठी लाच घेताना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात  //  बारडोलीजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; ७ ठार, ३८ जखमी  //  जैतपूरमधील अतिक्रमण कारवाईवर प्रश्नचिन्ह; स्थगितीची मागणी, आंदोलनाचा इशारा  //  शिरपूर मर्चंट को-ऑप बँक अपहार प्रकरणात व्यवस्थापक कुलकर्णीना अटक; आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई  //  पेट्रोलियम पदार्थाच्या दरवाढीविरोधात सीपीआय व किसान सभेचे धरणे आंदोलन; प्रांताधिकारी यांना दिले निवेदन  //  शहरातील नायरा पेट्रोलपंपाजवळ अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह,पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन

अमरिशभाई पटेल पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रातून ५१ युवकांना शासकीय सेवेत संधी

शिरपूर,: तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांना शासकीय सेवांसाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या अमरिशभाई पटेल पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राने अल्पावधीतच उल्लेखनीय यश संपादन केले असून, प्रशिक्षण केंद्राच्या मार्गदर्शनातून आतापर्यंत ५१ विद्यार्थ्यांनी विविध शासकीय सेवांमध्ये स्थान मिळविले आहे. यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात सरकारी सेवेत प्रवेश मिळविण्यासाठी जिद्द, शिस्त आणि सातत्य आवश्यक आहे. प्रशिक्षण केंद्र हे केवळ भरतीपूर्व मार्गदर्शनाचे व्यासपीठ नसून युवकांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले. शिरपूर तालुक्यातील युवकांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात केंद्राचे संचालक अन्साराम आगरकर यांनी अमरिशभाई पटेल पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण
केंद्राच्या कार्याचा आढावा घेतला. गेल्या वर्षभरात ५०० हून अधिक युवक-युवतींना पोलीस, अग्निवीर, केंद्रीय सुरक्षा दल, वनरक्षक तसेच इतर शासकीय भरती प्रक्रियांसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मैदानी सराव, शारीरिक चाचण्या, लेखी परीक्षांचे मार्गदर्शन आणि रॅपिड चाचण्यांचे नियमित आयोजन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.


आतापर्यंत एस.व्ही.के.एम. संचलित “श्री. अमरिशभाई पटेल पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र”अंतर्गत अमोल पवार (इंडियन आर्मी टेक्निकल), पवन मराठे (इंडियन आर्मी टेक्निकल), योगेश माळी (इंडियन आर्मी), जयेश जकातदार (इंडियन आर्मी टेक्निकल), सचिन ठाकरे (इंडियन आर्मी टेक्निकल), चेतन बोरसे (इंडियन आर्मी), ओम माळी (इंडियन आर्मी), रोहित पाटील (आर्मी क्लर्क), पंकज धाकड (आर्मी क्लर्क), सागर निकवाडे (सीआरपीएफ), चेतन माळी ( सीमा सुरक्षा बल आयटीबीपी), महेश बागले रा. शिरपूर (सीमा सुरक्षा दल), पवन ठाकूर (विद्युत सहाय्यक, महाराष्ट्र वीज वितरण कंपनी), आरती पावरा रा.आंबे (भारतीय टपाल सेवा), भूषण पाटील (मुंबई पोलीस), सोनाली बोरसे (महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल), दिनेश पावरा (महाराष्ट्र राज्य स्रक्षा दल), चेतन माळी (मुंबई पोलीस, रवींद्र माळी (मुंबई पोलीस), पंकज शिंदे (मुंबई पोलीस), पवन धनगर (मुंबई पोलीस), विजय कोळी (मुंबई पोलीस), योगेश चौधरी रा. शिरपूर (नवी मुंबई पोलीस), राज महाले (नवी मुंबई पोलीस), पूर्वेश बारी (मीरा भाईंदर पोलीस), जान्हवी पाटील (मीरा भाईंदर पोलीस), ममता पाटील (मीरा भाईंदर पोलीस), मनोहर कोळी (छत्रपती संभाजीनगर पोलीस), आकाश पारधी (धाराशिव पोलीस), गणेश मराठे (धुळे पोलीस), अशोक पावरा (धुळे पोलीस), अरविंद गिरासे (मुंबई पोलीस),  विशाल बागुल (महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल) या ३३ जणांची स्तुत्य निवड झाली आहे. तसेच गेल्या एका वर्षात एकूण ५१ विद्यार्थ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध सेवांमध्ये यश मिळविले असून, १५ हून अधिक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. ग्रामीण भागातील युवकांना मोठ्या शहरांमध्ये जाऊन प्रशिक्षण घेण्याची गरज भासू नये, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या केंद्राने अल्पावधीतच विश्वासार्हता निर्माण केली आहे.
समारोपप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पालकांनीही प्रशिक्षण केंद्राच्या कार्याचे कौतुक करत संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या यशाचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!