निकालात ९३ टक्के; पण आनंद साजरा करायला हर्षलच नाही…  //  आदिवासी समाज व्यसनमुक्तीसाठी सज्ज; शिरपूरात आ.पावरा यांच्या उपस्थितीत संघटनांची जनजागृती मोहिमेची हाक  //  तालुका पोलिसांची महामार्गावर मोठी कारवाई,४४ लाखांची विदेशी दारू जप्त;  //  तहसील कार्यालयातील कारभारावर संशय,स्टॅम्प पेपर प्रकरण तापले,नायब तहसीलदारांवर कारवाईची मागणी  //  १५ मेपर्यंत ऑनलाइन सुविधा उपलब्ध,तालुका वाशीयांना जनगणना स्वयं-नोंदणीचे आवाहन  //  समितीच्या कामाचा अहवाल जाहीर करा; बंजारा समाजाची मागणी  //  तालुक्यातील तरडीजवळ सोयाबीन ट्रक पलटी; चालक बचावला  //  खत वितरणात गैरप्रकार सहन केला जाणार नाही:-विशाल मोटे,नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना  //  अण्णाबाबांच्या विचारांना क्रीडा-कलेतून अभिवादन; उन्हाळी शिबिराचा दिमाखदार समारोप  //  प्रतिकूलतेवर मात; अविनाश पावरा ‘सुपर लीग’साठी निवड

आदिवासी समाज व्यसनमुक्तीसाठी सज्ज; शिरपूरात आ.पावरा यांच्या उपस्थितीत संघटनांची जनजागृती मोहिमेची हाक

शिरपूर : तालुक्यातील आदिवासी समाजामध्ये वाढत चाललेल्या व्यसनाच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करत व्यसनमुक्तीसाठी व्यापक जनजागृती मोहीम उभारण्याचा निर्धार करण्यात आला. आमदार काशिराम पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार कार्यालयात आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधींची महत्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीत समाजामध्ये वाढणारे व्यसन, त्याचे आरोग्य, कुटुंब व सामाजिक जीवनावर होणारे दुष्परिणाम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजाला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रबोधन व संघटित चळवळीची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार पावरा यांनी स्वतः पुढाकार घेत व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. यासाठी आदिवासी संघटनांनीही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. लवकरच तालुकाभर व्यसनमुक्ती जनजागृती अभियान व प्रबोधन कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले.
या अभियानाच्या पुढील नियोजनासाठी १७ मे रोजी सुळे येथे प्रबोधन मेळावा व नियोजन बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
बैठकीस मनोज पावरा, सुंदरलाल पावरा, भरत पावरा, डॉ. संदीप पावरा, यशवंत पावरा, जगदीश पावरा व जगदीश कनोजे उपस्थित होते.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!