साक्रीत धक्कादायक दुहेरी हत्याकांड; मांत्रिक पोलिसांच्या ताब्यात  //  कोंडाईबारी घाटात वनविभागाची मोठी कारवाई;सव्वा 28 लाखाचा लाकूडसाठा जप्त  //  माँ बड़ी बिजासन मंदिराचा पाच कोटींत रजतसाज; १२१ किलो चांदी, अर्धा किलो सोन्याचा वापर  //  आशा स्वयंसेविका भरतीसाठी ठराव देण्यास टाळाटाळ; सरपंच, ग्रामसेवकाविरोधात तक्रार  //  वीजपुरवठ्यातील कपात तात्काळ रद्द करा; अन्यथा १८ मे रोजी आंदोलनाचा इशारा  //  टेक्सटाईल डिप्लोमा शिक्षणानंतर थेट 'करिअर'ची भरारी! कॅम्पस प्लेसमेंटने उंचावले विद्यार्थ्यांचे भविष्य  //  पत्नीसमोर अपमानाचा राग; मुलाकडून आई-वडिलांची निर्घृण हत्या; शमुलगा पोलिसांच्या ताब्यात  //  बबळाजमध्ये महसूल प्रशासन थेट जनतेच्या दारी; 650 लाभार्थ्यांनी घेतला योजनांचा लाभ  //  गधडदेवच्या बनावट दारू प्रकरणातील मुख्य संशयित फरार;विभागाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह  //  तालुक्यातील गधडदेव शिवारात बनावट देशीदारूचा कारखाना उद्धवस्त; लाखोंचा मुद्देमाल जप्त,

साक्रीत धक्कादायक दुहेरी हत्याकांड; मांत्रिक पोलिसांच्या ताब्यात

साक्री (प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात श्रद्धा, अंधविश्वास आणि गुन्हेगारीचा थरकाप उडवणारा प्रकार उघडकीस आला आहे. पूजा-विधीच्या बहाण्याने बोलावलेल्या महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न करून तिचा गळा आवळून खून करण्यात आला. या घटनेचा उलगडा होऊ नये म्हणून तिच्यासोबत आलेल्या मित्रालाही लोखंडी टॉमीने ठार मारण्यात आले. निजामपूर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत या दुहेरी हत्याकांडाचा छडा लावत संशयित मांत्रिकाला अटक केली.
शुक्रवारी (16 मे) रायपूर-वरधाने रस्त्यालगत एमएच-18 सीएच-8151 क्रमांकाच्या दुचाकीजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भामरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
मृत महिलेची ओळख जयश्री रजनीकांत काकुस्ते (रा. कासारे, ता. साक्री) अशी झाली. तपासात त्या जैताणे शिवारात पूजा-विधीसाठी गेल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी योगेश बापू खैरनार (रा. जैताणे) याला ताब्यात घेतले.
चौकशीत जयश्री यांच्यावर जबरदस्तीचा प्रयत्न केल्याची कबुली आरोपीने दिली. त्यांनी प्रतिकार करत आरडाओरड सुरू केल्याने गळा आवळून हत्या केल्याचे त्याने सांगितले.
यानंतर जयश्री यांच्यासोबत आलेले अक्षय गंगाधर सोनवणे यांनी विचारणा केल्याने आरोपीने त्यांच्यावर लोखंडी टॉमीने वार करून खून केला. मृतदेह जंगलातील काटेरी झुडपात फेकून जाळण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
श्रद्धेच्या नावाखाली घडलेल्या या पाशवी दुहेरी हत्येमुळे साक्री तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!