माँ बड़ी बिजासन मंदिराचा पाच कोटींत रजतसाज; १२१ किलो चांदी, अर्धा किलो सोन्याचा वापर  //  आशा स्वयंसेविका भरतीसाठी ठराव देण्यास टाळाटाळ; सरपंच, ग्रामसेवकाविरोधात तक्रार  //  वीजपुरवठ्यातील कपात तात्काळ रद्द करा; अन्यथा १८ मे रोजी आंदोलनाचा इशारा  //  टेक्सटाईल डिप्लोमा शिक्षणानंतर थेट 'करिअर'ची भरारी! कॅम्पस प्लेसमेंटने उंचावले विद्यार्थ्यांचे भविष्य  //  पत्नीसमोर अपमानाचा राग; मुलाकडून आई-वडिलांची निर्घृण हत्या; शमुलगा पोलिसांच्या ताब्यात  //  बबळाजमध्ये महसूल प्रशासन थेट जनतेच्या दारी; 650 लाभार्थ्यांनी घेतला योजनांचा लाभ  //  गधडदेवच्या बनावट दारू प्रकरणातील मुख्य संशयित फरार;विभागाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह  //  तालुक्यातील गधडदेव शिवारात बनावट देशीदारूचा कारखाना उद्धवस्त; लाखोंचा मुद्देमाल जप्त,  //  शिरपूर तहसीलच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक,बोराडीत महसूल शिबिरातून 600 नागरिकांना लाभ  //  जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचा शिरपूर दौरा; पोलीस ठाण्यांची पाहणी,अधिक प्रभावी कामकाजाच्या सूचना

वीजपुरवठ्यातील कपात तात्काळ रद्द करा; अन्यथा १८ मे रोजी आंदोलनाचा इशारा

शिरपूर (प्रतिनिधी): बभळाज उपकेंद्रातून शेतीपंपांसाठी दिल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यात करण्यात आलेली एक तासाची कपात त्वरित रद्द करून पूर्ववत आठ तास सुरळीत व उच्च दाबाने वीजपुरवठा करावा, अन्यथा महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने १८ मे रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी बभळाज उपकेंद्रात महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, या परिसरातील शेतकऱ्यांना यापूर्वी शेतीपंपांसाठी आठ तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून वीजपुरवठा सात तासांवर आणण्यात आला असून तोही कमी दाबाने व वारंवार खंडित होत आहे.
सध्या वाढत्या तापमानामुळे केळी, पपई तसेच नव्याने लागवड केलेल्या पिकांना अधिक पाण्याची आवश्यकता आहे. मात्र अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने रोपे जळण्याचा धोका निर्माण झाला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे किसान सभेने नमूद केले आहे.
शेतकऱ्यांना पुन्हा आठ तास नियमित व योग्य दाबाने वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा सोमवार, १८ मे रोजी बभळाज उपकेंद्र कार्यालयासमोर किसान सभेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या आंदोलनात परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभेच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!