तालुक्यातील गधडदेव शिवारात बनावट देशीदारूचा कारखाना उद्धवस्त; लाखोंचा मुद्देमाल जप्त,  //  शिरपूर तहसीलच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक,बोराडीत महसूल शिबिरातून 600 नागरिकांना लाभ  //  जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचा शिरपूर दौरा; पोलीस ठाण्यांची पाहणी,अधिक प्रभावी कामकाजाच्या सूचना  //  पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक ७ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात  //  मुकेश आर. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश, गुणवंतांचा गुणगौरव   //  शिरपूरच्या भाजीपाला मार्केटमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला  //  एटीएम कार्डची अदलाबदल करून वृद्धाच्या खात्यातून २२ हजारांची फसवणूक  //  प्लायवूडने भरलेला ट्रक भीषण आग,ट्रक जळून खाक,हाडाखेडजवळ अपघात  //  खेळातील दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन,किसान विद्या प्रसारक संस्थेत खेळाडूंसाठी विशेष सत्र; स्पोर्ट्स फिजिओलॉजिस्ट डॉ. विशाल वाल्हे यांचे मार्गदर्शन  //  15 वर्षाखालील मुलींच्या धुळे जिल्हा क्रिकेट संघासाठी निवड चाचणीचे आयोजन 

शिरपूर तहसीलच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक,बोराडीत महसूल शिबिरातून 600 नागरिकांना लाभ

बोराडी | प्रतिनिधी /- सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत आणि त्यांच्या महसूल विषयक कामांचा तातडीने निपटारा व्हावा, या उद्देशाने शिरपूर तहसील कार्यालयाच्या वतीने बोराडी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 600 हून अधिक नागरिकांची विविध कामे एकाच ठिकाणी मार्गी लागली.
राज्य शासनाच्या ‘महाराजस्व अभियान टप्पा-1’ अंतर्गत आयोजित या शिबिरात महसूल विभागाच्या तब्बल 14 सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये प्रलंबित फेरफार, 7/12 उताऱ्यातील त्रुटी दुरुस्ती (कलम 155), डिजिटल 7/12 व 8-अ उताऱ्यांचे वितरण, उत्पन्न, रहिवासी आणि शालेय दाखल्यांचे जागीच वाटप करण्यात आले.
याशिवाय संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, आयुष्मान भारत कार्ड, नवीन शिधापत्रिका, ट्रॅक्टर अनुदान, तसेच वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या शेतकरी ओळख क्रमांकासाठी केवायसी प्रक्रिया अशा विविध योजनांशी संबंधित कामांचाही प्राधान्याने निपटारा करण्यात आला.
या प्रसंगी तहसीलदार महेंद्र माळी यांनी सांगितले की, शासन नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून सामान्यांची कामे वेळेत, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण व्हावीत, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी अशा शिबिरांचा लाभ घेऊन शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांनी शिरपूर महसूल विभागाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक केले. यावेळी बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, मंडळातील ग्रामस्थ, विद्यार्थी, सर्व तलाठी, कृषी सहाय्यक तसेच तालुका आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी पावरा यांनी केले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा

खेळातील दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन,किसान विद्या प्रसारक संस्थेत खेळाडूंसाठी विशेष सत्र; स्पोर्ट्स फिजिओलॉजिस्ट डॉ. विशाल वाल्हे यांचे मार्गदर्शन

पुढे वाचा »
error: Content is protected !!