
शिरपूर : किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर यांच्या वतीने संस्थेतील खेळाडूंसाठी ‘खेळातील दुखापती व त्यावरील उपचार’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील प्रख्यात स्पोर्ट्स फिजिओलॉजिस्ट डॉ. विशाल वाल्हे यांनी खेळाडूंना दुखापती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना, योग्य व्यायाम, संतुलित आहार, पुनर्वसन प्रक्रिया आणि सरावादरम्यान घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली.
डॉ. वाल्हे यांनी खेळाडूंनी फिटनेससोबतच शरीरातील सूक्ष्म बदलांकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले. वेळेवर उपचार आणि योग्य पुनर्वसन केल्यास दुखापतींचा धोका कमी होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. वाल्हे यांचा सत्कार के. व्ही. टी. आर. सी. बी. एस. ई. स्कूलचे उपप्राचार्य विवेक पाटील, कला विभाग प्रमुख संजय भदाणे आणि सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख महेंद्र पानपाटील यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
प्रास्ताविकात क्रीडा विभाग प्रमुख राकेश बोरसे यांनी संस्थेच्या क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत अशा सत्रांचे महत्त्व अधोरेखित केले.
या वेळी क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक विजेंद्र जाधव, नूर तेली, हेमंत शिरसाठ, स्वप्निल पाटील, कल्पेश माळी, सागर कोळी, कुणाल गिरासे तसेच सहाय्यक प्रशिक्षक आणि संस्थेचे खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, कोषाध्यक्ष आशाताई रंधे, संचालक राहुल रंधे, रोहित रंधे, शशांक रंधे, संजय गुजर, मुख्याध्यापिका सुरेखा मिस्त्री, समन्वयक सागर वाघ, सल्लागार डॉ. लिंबाजी प्रताळे, मयूर बोरसे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
या मार्गदर्शन सत्रामुळे खेळाडूंना दुखापतींबाबत योग्य माहिती मिळून त्यांच्या सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण क्रीडा प्रवासाला निश्चितच दिशा मिळाली.
