15 वर्षाखालील मुलींच्या धुळे जिल्हा क्रिकेट संघासाठी निवड चाचणीचे आयोजन   //  शहादा रस्त्यावर भीषण अपघात; कारचालकाचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी  //  शॉर्टसर्किटमुळे मका पीक जळून खाक; भाटपुरा येथील शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान  //  ऑल इंडिया ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या विभागीय प्रभारी अध्यक्षपदी राजेंद्र भंडारी निवड  //  महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड २०२६ने एकनाथ सावळे यांचा गौरव  //  शिरपूर तहसील कार्यालयातील बनावट राजमुद्रा प्रकरण; तहसीलदारांच्या पत्रातून धक्कादायक खुलासे  //  आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलातील गुणवंतांचा गौरवदहावीच्या निकालात २१ शाखांचा शंभर टक्के निकाल; ९३६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण  //  आमदार कार्यालयात महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आ.पावरा यांच्यातर्फे अभिवादन  //  हायवेवरील बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा उलगडा; मध्य प्रदेशातील आरोपी अटकेत  //  शिरपूर तालुक्यात जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण

15 वर्षाखालील मुलींच्या धुळे जिल्हा क्रिकेट संघासाठी निवड चाचणीचे आयोजन 

शिरपूर : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे दि. 19 मे 2026 पासून 15 वर्षाखालील मुलींच्या आमंत्रित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत धुळे जिल्हा क्रिकेट संघ सहभागी होणार आहे.

त्या अनुंषगाने धुळे जिल्हा क्रिकेट संघाची निवड चाचणी आर. सी. पटेल फॉर्मसी महाविद्यालय मैदान, शिरपूर येथे दि. 14 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता आयोजित केली असून त्याच दिवशी संघाची निवड होणार आहे. दि. 1 सप्टेंबर 2011 ते दि. 31 ऑगस्ट 1014 या कालावधीमध्ये जन्मलेल्या खेळाडूनाच निवड शिबिरात सहभाग घेता येईल.तसेच निवड झालेल्या संघाचे सराव शिबिर लगेच दि.  15 ते 16 मे 2026 दरम्यान शिरपूर येथेच होणार असून दि. 16 मे 2026 रोजी संध्याकाळी संघ शिरपूर येथून स्पर्धेसाठी परस्पर रवाना होणार आहे.

तरी निवड चाचणीत सहभाग घेवू इच्छिणाऱ्या महिला क्रिकेटपटूंनी अधिक माहितीसाठी प्रशिक्षक पूजा जैन, (मो. 9607551305) यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

टिप : निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. क्रिकेटपटूंनी मुक्कामाची तयारी करुन यावे. आवश्यक ते कागदपत्रे सोबत ठेवावीत.तरी धुळे जिल्ह्यातील 15 वर्षाखालील खेळाडू मुलींनी जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभाग घ्यावा असे आवाहन धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व सल्लागार तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी केले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!