शिरपूर:- कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्याबद्दल शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील एकनाथ धनलाल सावळे यांना ‘महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.
Agro Care Group of Companies� यांच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० मान्यवरांचा या वेळी सन्मान करण्यात आला. त्यामध्ये कृषी क्षेत्रातील कार्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाना भागात उपकृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले एकनाथ सावळे यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजीव सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कैलास मोते, चैत्राम पवार, रवींद्र माने आणि अभिमन्यू काशीद उपस्थित होते.
एकनाथ सावळे हे थाळनेर येथील जमादार पाडा शाळेचे मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल सावळे यांचे धाकटे बंधू आहेत. त्यांच्या या यशाबद्दल थाळनेर परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
