साक्रीत धक्कादायक दुहेरी हत्याकांड; मांत्रिक पोलिसांच्या ताब्यात  //  कोंडाईबारी घाटात वनविभागाची मोठी कारवाई;सव्वा 28 लाखाचा लाकूडसाठा जप्त  //  माँ बड़ी बिजासन मंदिराचा पाच कोटींत रजतसाज; १२१ किलो चांदी, अर्धा किलो सोन्याचा वापर  //  आशा स्वयंसेविका भरतीसाठी ठराव देण्यास टाळाटाळ; सरपंच, ग्रामसेवकाविरोधात तक्रार  //  वीजपुरवठ्यातील कपात तात्काळ रद्द करा; अन्यथा १८ मे रोजी आंदोलनाचा इशारा  //  टेक्सटाईल डिप्लोमा शिक्षणानंतर थेट 'करिअर'ची भरारी! कॅम्पस प्लेसमेंटने उंचावले विद्यार्थ्यांचे भविष्य  //  पत्नीसमोर अपमानाचा राग; मुलाकडून आई-वडिलांची निर्घृण हत्या; शमुलगा पोलिसांच्या ताब्यात  //  बबळाजमध्ये महसूल प्रशासन थेट जनतेच्या दारी; 650 लाभार्थ्यांनी घेतला योजनांचा लाभ  //  गधडदेवच्या बनावट दारू प्रकरणातील मुख्य संशयित फरार;विभागाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह  //  तालुक्यातील गधडदेव शिवारात बनावट देशीदारूचा कारखाना उद्धवस्त; लाखोंचा मुद्देमाल जप्त,

कोंडाईबारी घाटात वनविभागाची मोठी कारवाई;सव्वा 28 लाखाचा लाकूडसाठा जप्त

नवापूर/नंदुरबार (प्रतिनिधी) कोंडाईबारी घाटातील वनउपज तपासणी नाका चौकीवर वनविभागाने मोठी कारवाई करत अवैधरित्या वाहतूक होत असलेला तब्बल 28 लाख 25 हजार 124 रुपयांचा खैर लाकूडसाठा जप्त केला. या कारवाईमुळे अवैध लाकूड वाहतुकीच्या साखळीला मोठा धक्का बसला आहे.
सहाय्यक वनसंरक्षक, नंदुरबार प्रादेशिक व वन्यजीव विभाग यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित ट्रक (क्रमांक GJ 17 XX 9955) कोंडाईबारी घाटात अडविण्यात आला. तपासणीदरम्यान वाहनात खैर लाकूड आढळून आले. चालकाने तेलंगणा राज्यातील एनटीपीएस एनओसी सादर केली; मात्र ऑनलाइन पडताळणीत कागदपत्रांमध्ये तफावत आढळली. यानंतर चालक ट्रक सोडून फरार झाला.
जप्त वाहन नवापूर येथील शासकीय विक्री आगारात आणून लाकडाची मोजणी करण्यात आली. त्यात 862 नग, 19.502 घनमीटर खैर लाकूड आढळून आले. वनरक्षक सतीश पदमर यांनी प्रथम अहवाल क्रमांक 02/2025 अन्वये वनगुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कार्यवाही वनपाल सुजित बेडसे, युवराज भाबड, श्रीमती शितल तोरवने वनरक्षक सतीश पदमर, जितेंद्र पवार, रामदास पावरा, देवमन सूर्यवंशी,अनिल वळवी,अमोल गावीत, राहुल गावीत, शिवराम गावीत,वसंत कोकणी,श्रीमती निताली गावीत,कायम वनमजूर, रोजनदारी वनमजूर, वाहचालक यांनी सहभाग नोंदविला.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!