ऑल इंडिया ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या विभागीय प्रभारी अध्यक्षपदी राजेंद्र भंडारी निवड  //  महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड २०२६ने एकनाथ सावळे यांचा गौरव  //  शिरपूर तहसील कार्यालयातील बनावट राजमुद्रा प्रकरण; तहसीलदारांच्या पत्रातून धक्कादायक खुलासे  //  आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलातील गुणवंतांचा गौरवदहावीच्या निकालात २१ शाखांचा शंभर टक्के निकाल; ९३६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण  //  आमदार कार्यालयात महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आ.पावरा यांच्यातर्फे अभिवादन  //  हायवेवरील बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा उलगडा; मध्य प्रदेशातील आरोपी अटकेत  //  शिरपूर तालुक्यात जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण  //  निकालात ९३ टक्के; पण आनंद साजरा करायला हर्षलच नाही…  //  आदिवासी समाज व्यसनमुक्तीसाठी सज्ज; शिरपूरात आ.पावरा यांच्या उपस्थितीत संघटनांची जनजागृती मोहिमेची हाक  //  तालुका पोलिसांची महामार्गावर मोठी कारवाई,४४ लाखांची विदेशी दारू जप्त;

ऑल इंडिया ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या विभागीय प्रभारी अध्यक्षपदी राजेंद्र भंडारी निवड

शिरपूर :- येथील सामाजिक कार्यकर्ते तथा श्री कृषी विकास केंद्राचे संचालक राजेंद्र भंडारी यांची ऑल इंडिया ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या विभागीय प्रभारी अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.
दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या असोसिएशनच्या निवडणुकीत ही निवड जाहीर करण्यात आली. भंडारी यांच्याकडे महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड आणि गोवा या राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील दीर्घ अनुभव, विक्रेत्यांच्या प्रश्नांबाबत सातत्याने घेतलेली भूमिका आणि सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग यामुळे त्यांची निवड झाल्याचे सांगण्यात आले.
भंडारी यांच्या निवडीबद्दल धुळे जिल्हा सीड्स, पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मानसिंग (अण्णा) गिरासे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच जिल्ह्यातील संचालक मंडळ, शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हेमंत चौधरी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
या निवडीमुळे शिरपूरच्या कृषी क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. कृषी विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि शेतकरी हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी भंडारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!