शिरपूर : राष्ट्रगौरव महाराणा प्रताप यांच्या ४८६ व्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता. ९) शिरपूर येथील आमदार कार्यालयात भारतीय जनता पक्षातर्फे अभिवादन कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्य, राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमानपूर्ण जीवनकार्याचा गौरव केला. संकटांशी झुंज देत त्यांनी मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी अखेरपर्यंत संघर्ष केला. मुघल सम्राट अकबराच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध त्यांनी दिलेला लढा भारतीय इतिहासातील प्रेरणादायी अध्याय मानला जातो, असे वक्त्यांनी सांगितले.
महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे १५४० रोजी राजस्थानातील पाली येथे झाला. हल्दीघाटीच्या युद्धातील त्यांचा पराक्रम आणि चेतक घोड्याची निष्ठा आजही प्रेरणादायी मानली जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वाभिमानाने जगत त्यांनी स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली.
यावेळी आमदार काशिराम दादा पावरा, नंदुरबार जिल्हा भाजप प्रभारी बबनराव चौधरी, शिरपूर विधानसभा प्रमुख के. डी. पाटील, विखरण मंडळ अध्यक्ष भरत पाटील, सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल, थाळनेर मंडळ अध्यक्ष विरूपाल राजपूत, कृउबा माजी सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, पं. स. माजी उपसभापती जगतसिंग राजपूत, नगरसेवक राज सिसोदिया, हर्षल गिरासे, भाजपा ग्रामीण सरचिटणीस योगेंद्रसिंग सिसोदिया, शहर सरचिटणीस नरेंद्र पाटील, भाजपा शहर उपाध्यक्ष देवेंद्र राजपूत, चिटणीस राजेंद्र चौधरी, माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, संजय आसापुरे (ओबीसी मोर्चा), महेंद्र पाटील, राधेश्याम भोई, रामेश्वर शिवदे, रविंद्र भोई, नरेश पवार, नंदू माळी, राजू शेख, मनजित पावरा, गजेंद्रसिंग राजपूत, योगीराज बोरसे, संजय साळुंखे, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
