आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलातील गुणवंतांचा गौरवदहावीच्या निकालात २१ शाखांचा शंभर टक्के निकाल; ९३६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण  //  आमदार कार्यालयात महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आ.पावरा यांच्यातर्फे अभिवादन  //  हायवेवरील बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा उलगडा; मध्य प्रदेशातील आरोपी अटकेत  //  शिरपूर तालुक्यात जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण  //  निकालात ९३ टक्के; पण आनंद साजरा करायला हर्षलच नाही…  //  आदिवासी समाज व्यसनमुक्तीसाठी सज्ज; शिरपूरात आ.पावरा यांच्या उपस्थितीत संघटनांची जनजागृती मोहिमेची हाक  //  तालुका पोलिसांची महामार्गावर मोठी कारवाई,४४ लाखांची विदेशी दारू जप्त;  //  तहसील कार्यालयातील कारभारावर संशय,स्टॅम्प पेपर प्रकरण तापले,नायब तहसीलदारांवर कारवाईची मागणी  //  १५ मेपर्यंत ऑनलाइन सुविधा उपलब्ध,तालुका वाशीयांना जनगणना स्वयं-नोंदणीचे आवाहन  //  समितीच्या कामाचा अहवाल जाहीर करा; बंजारा समाजाची मागणी

हायवेवरील बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा उलगडा; मध्य प्रदेशातील आरोपी अटकेत

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी शिवारात उभ्या असलेल्या वाहनातून बॅग चोरी करणाऱ्या परराज्यातील टोळीतील एका आरोपीला शिरपूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सांगवी गावाजवळील देवमोगरा चहा हॉटेलसमोर फिर्यादीची इनोव्हा (एमएच ४१ एके ०१०१) उभी होती. या वाहनातून अज्ञात चोरट्यांनी बॅग लंपास केली. बॅगेत ५५ हजार रुपये रोख, विविध बँकांचे एटीएम व डेबिट कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर कागदपत्रे होती.या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील मनावर तालुक्यातील असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार कल्याण जगदीश आलावा (वय २५, रा. डेडगाव, ता. मनावर, जि. धार, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडून ५५ हजार रुपये रोख, इअरबड्स, मनगटी घड्याळ तसेच चोरीस गेलेली कागदपत्रे असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार सुनील पाठक, संतोष पाटील, योगेश मोरे, स्वप्नील बांगर आणि विजय ढिवरे यांनी केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!