शिरपूरात गरजूंसाठी शिलाई मशीन, पिठाच्या गिरण्या व तिनचाकी सायकलींचे वाटप  //  मुकेशभाई पटेल सैनिक स्कूलचे खेळाडू जिल्हा बास्केटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा जिल्हा अजिंक्य  //  खरेदीखताची नक्कल देण्यासाठी १० हजारांची मागणी; ४ हजार घेताना एसीबीची कारवाई  //  पुणे जिल्ह्यातील अत्याचार घटनांवर संताप; डॉक्टरांवर कारवाईची मागणी  //  शिरपुरात माता मृत्यूने खळबळ; बाळंतपणानंतर 25 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू  //  तालुक्यातील वन जमीन धारक आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी मंजूर;आ.अमरीशभाई पटेल यांच्या प्रयत्नांना यश  //  शिरपूरजवळ रिक्षा पलटी; एकाचा मृत्यूशिरपूर : तालुक्यातील साकवद–बाळदे  //  धुळे जिल्हा क्रिकेट संघाच्या 16 वर्षाखालील संघाची दिमाखदार कामगिरी   //  आमदार अमरिशभाई पटेल यांची दूरदृष्टी ठरली जलक्रांतीची दिशा…!  //  शस्त्रक्रियेत धक्कादायक हलगर्जी; महिलेच्या पोटात कापड राहिल्याचा आरोप, डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

शिरपूर फाट्यावर दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू; अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा

शिरपूर : मुंबई–आग्रा महामार्गावरील शिरपूर फाट्याजवळील रोज पॅलेस हॉटेल समोर दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने 29 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 20) दुपारी घडली. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कृष्णा उखा राठोड वय 29, रा.शितापूर, ता.जि.बुरहानपूर, म.प्र., सध्या रा. दहिवद, ता. शिरपूर असे मृताचे नाव आहे. तो मजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास तो त्याच्या ताब्यातील एमपी 46 एमएस 5417 या क्रमांकाच्या एचएफ डिलक्स दुचाकीने महामार्गावरून दहिवदहून शिरपूरकडे जात असताना शिरपूर फाट्याजवळील हॉटेलसमोर मागून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.
या अपघातात कृष्णा राठोड याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला हायवे अॅम्ब्युलन्सद्वारे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास त्याला मयत घोषित केले.
दरम्यान, अपघात घडवून अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. याबाबत लखन सुकलाल राठोड (रा. मोहाडी, ता. जि. जळगाव) यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!