घरफोडी प्रकरणाचा नरडाणा पोलिसांकडून उलगडा; तीन संशयितसह बालक ताब्यात  //  मोडी लिपीतील पहिल्या शिवचरित्राचे प्रकाशन; शिवराय ‘रयतेचे लोकोत्तर राजा’ - डॉ. मुणगेकर  //  दुर्गम भागातील क्रिकेट हिर्‍यांचा शोध सुरू; शिरपूरात टॅलेंट सर्चचे उद्घाटन  //  एमपीएससी गट-ब पूर्व परीक्षेसाठी मोफत सराव परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद  //  महागाई, बेरोजगारी आणि कर्जमाफीसाठी शिरपुरात ठाकरे गटाचा धडक मोर्चा  //  शिरपूर महसूल विभागात 'ज्वालामुखी' महास्फोट! करोडोंची जमीन बळकावण्यासाठी थेट 'बोगस सरकारी शिक्के' मारणारी ७ जणांची टोळी;  //  सावळदा येथे तापी नदीत दोन मृतदेह दिसले; एक बाहेर, दुसऱ्याचा शोध सुरू  //  अमरिशभाई पटेल पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रातून ५१ युवकांना शासकीय सेवेत संधी  //  लखा पाटील नगरात श्री राधा-कृष्ण मंदिराच्या पायाभरणीचा शुभारंभ  //  नंदुरबारात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आ. अमरिशभाई पटेल यांच्याकडून स्वागत

मोडी लिपीतील पहिल्या शिवचरित्राचे प्रकाशन; शिवराय ‘रयतेचे लोकोत्तर राजा’ – डॉ. मुणगेकर

मुंबई,:- छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर जगाच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ लोकाभिमुख राजे होते. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार होणे आवश्यक असून, त्यासाठी विविध भाषांमधून साहित्य प्रकाशित करणारे डॉ. हेमंतराजे गायकवाड यांचे कार्य अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन माजी खासदार व कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.
दादर येथे श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनलतर्फे आयोजित ‘शिवोत्सव सोहळ्या’त ‘शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट’ या ग्रंथाच्या मोडी लिपीतील आवृत्तीचे प्रकाशन डॉ. मुणगेकर यांच्या हस्ते झाले. शिवराज्याभिषेकाच्या ३५६ व्या वर्षानिमित्त हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलताना डॉ. मुणगेकर म्हणाले, ‘‘शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ वाचण्यापुरता नसून त्यांच्या आदर्शांचा स्वीकार करणे ही आजची गरज आहे. समाजातील सर्व घटकांच्या हिताचा विचार करणारा, स्त्रियांच्या सन्मानाचे रक्षण करणारा आणि न्यायप्रिय राज्यकर्ता म्हणून शिवरायांचे स्थान अद्वितीय आहे. त्यांचे हिंदवी स्वराज्य म्हणजे सर्व एतद्देशीय लोकांचे राज्य होय.’’
संस्थापक डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना, ‘‘शिवचरित्र जगभर पोहोचविण्याचे कार्य हे महाराजांचीच प्रेरणा असल्याची भावना आहे,’’ असे सांगितले. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक तुळशीदास भोईटे यांनी रायगडाच्या नियोजनक्षमतेचा उल्लेख करत शिवरायांच्या दूरदृष्टीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात पद्मश्री उदय देशपांडे, सुनील पवार, संदीप सुर्वे, रवींद्र मालुसरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवकार्य, दुर्गसंवर्धन, इतिहास संशोधन आणि मोडी लिपी संवर्धन क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. मोडी लिपीतील हे शिवचरित्र प्रकाशित होणे ही ऐतिहासिक घटना ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!