घरफोडी प्रकरणाचा नरडाणा पोलिसांकडून उलगडा; तीन संशयितसह बालक ताब्यात  //  मोडी लिपीतील पहिल्या शिवचरित्राचे प्रकाशन; शिवराय ‘रयतेचे लोकोत्तर राजा’ - डॉ. मुणगेकर  //  दुर्गम भागातील क्रिकेट हिर्‍यांचा शोध सुरू; शिरपूरात टॅलेंट सर्चचे उद्घाटन  //  एमपीएससी गट-ब पूर्व परीक्षेसाठी मोफत सराव परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद  //  महागाई, बेरोजगारी आणि कर्जमाफीसाठी शिरपुरात ठाकरे गटाचा धडक मोर्चा  //  शिरपूर महसूल विभागात 'ज्वालामुखी' महास्फोट! करोडोंची जमीन बळकावण्यासाठी थेट 'बोगस सरकारी शिक्के' मारणारी ७ जणांची टोळी;  //  सावळदा येथे तापी नदीत दोन मृतदेह दिसले; एक बाहेर, दुसऱ्याचा शोध सुरू  //  अमरिशभाई पटेल पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रातून ५१ युवकांना शासकीय सेवेत संधी  //  लखा पाटील नगरात श्री राधा-कृष्ण मंदिराच्या पायाभरणीचा शुभारंभ  //  नंदुरबारात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आ. अमरिशभाई पटेल यांच्याकडून स्वागत

एमपीएससी गट-ब पूर्व परीक्षेसाठी मोफत सराव परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरपूर (प्रतिनिधी) : एस.व्ही.के.एम. संचालित केतकीबेन मुकेशभाई पटेल केंद्रीय ग्रंथालय, शिरपूर, श्री अमरिशभाई पटेल पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, शिरपूर तसेच इग्नाइट स्पर्धा परीक्षा अकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मोफत सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दि. १४ जून रोजी होणाऱ्या एमपीएससी गट-ब पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षा अभ्यासकांना प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव मिळावा, तसेच आयोगाच्या अभ्यासक्रम व गुणपद्धतीची माहिती व्हावी या उद्देशाने श्रीमती केतकीबेन मुकेशभाई पटेल केंद्रीय ग्रंथालय येथे सराव परीक्षा घेण्यात आली. सकाळी ११ ते १२ या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
सराव परीक्षेनंतर प्रश्नपत्रिकेचे सविस्तर विश्लेषण इग्नाइट स्पर्धा परीक्षा अकॅडमी, पुणे यांच्या माध्यमातून सायंकाळी ६ वाजता यूट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन करून त्यांना ऑनलाइन मार्गदर्शनही करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशिक्षण केंद्राचे संचालक अन्साराम आगरकर, इग्नाइट स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक धनंजय कचाले, व्यवस्थापक सतीष पाटील, अभिजित राठोड (पुणे), केंद्रीय ग्रंथालयाचे उपग्रंथपाल अश्विन अमृतकर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विकास राजपूत, सुभाष पावरा, डॉ. कैलास पाटील, तुषार मारवाडी, विवेक पाटील व निखील पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल एस.व्ही.के.एम.चे अध्यक्ष तथा माजी मंत्री-आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा, एस.व्ही.के.एम.चे सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल तसेच उपाध्यक्ष व लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांनी समाधान व्यक्त केले. शिरपूर तालुक्यातील युवक-युवतींनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय सेवांमध्ये यश संपादन करून नेतृत्व करावे, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य व मार्गदर्शन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!