विना हेल्मेट फिरणाऱ्या पोलिसांवर पोलिसांची धडक कारवाई  //  तालुक्यात एकाच रात्रीत चार घरफोड्या ; ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ  //  शिरपूरात अवैध सावकारी प्रकरण तापले ; तिघांविरोधात गुन्हा दाखल  //  शिरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई; बनावट देशी दारू ‘टँगो पंच’ कारखाना उद्ध्वस्त  //  तालुक्यात बनावट देशीदारूचा मिनी कारखाना उद्ध्वस्त,रा.उ.शु.विभागाची धडक कारवाई; मुख्य संशयित फरार  //  ‘महसूल आपल्या दारी’; दहिवद येथे समाधान शिबिर यशस्वी,८०० लाभार्थ्यांनी घेतला लाभ  //  आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला; तरुणावर कोयत्याने हल्ला  //  बोराडीत ग्रामदैवताच्या रथाला आग लावण्याचा प्रयत्न; ग्रामस्थांमध्ये संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी  //  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून शिरपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी १४.०८ कोटींचा निधी मंजूर  //  चांदसूर्या येथे अवैध मद्यनिर्मितीवर पोलिसांचा छापा; १.७७ लाखांचा साठा जप्त

तालुक्यात एकाच रात्रीत चार घरफोड्या ; ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ

शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत एकाच रात्रीत दोन गावांमध्ये चार धाडसी घरफोड्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आमोदे गावात एक तर बलकुवे गावात तीन घरफोड्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे शहर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत चोरी केली. घरफोड्यांमध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तू असा लाखो रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे.
विशेष म्हणजे, मागील काही महिन्यांतील अनेक घरफोडी प्रकरणांचा अद्याप उलगडा झालेला नसताना पुन्हा एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात पोलिस गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पुढील कार्यवाही शहर पोलीस करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!