शिरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई; बनावट देशी दारू ‘टँगो पंच’ कारखाना उद्ध्वस्त  //  तालुक्यात बनावट देशीदारूचा मिनी कारखाना उद्ध्वस्त,रा.उ.शु.विभागाची धडक कारवाई; मुख्य संशयित फरार  //  ‘महसूल आपल्या दारी’; दहिवद येथे समाधान शिबिर यशस्वी,८०० लाभार्थ्यांनी घेतला लाभ  //  आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला; तरुणावर कोयत्याने हल्ला  //  बोराडीत ग्रामदैवताच्या रथाला आग लावण्याचा प्रयत्न; ग्रामस्थांमध्ये संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी  //  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून शिरपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी १४.०८ कोटींचा निधी मंजूर  //  चांदसूर्या येथे अवैध मद्यनिर्मितीवर पोलिसांचा छापा; १.७७ लाखांचा साठा जप्त  //  आर.सी.पटेल उर्दू विद्यालयात सामाजिक समता सप्ताह उत्साहात  //  शिरपूर फर्स्टची 23 मेपासून तालुकाभर ‘जनसंघर्ष यात्रा’  //  कर्मवीर पूर्वभरती सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे घवघवीत यशपोलिस व सैन्य भरतीत ७ प्रशिक्षणार्थींची यशस्वी निवड

शिरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई; बनावट देशी दारू ‘टँगो पंच’ कारखाना उद्ध्वस्त

शिरपूर : मानवी जीवितास घातक ठरणारी बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर शिरपूर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला. या कारवाईत तब्बल ३ लाख १० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून मुख्य संशयित फरार झाला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत १९ मे रोजी पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर शहर पोलिसांनी निमझरी रोड परिसरात छापा टाकला.
या वेळी नितेंद्र पोपटराव पावरा (वय ३८, रा. चांदसूर्या, ता. शिरपूर) याच्या ताब्यातील ठिकाणी बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून स्पिरिट, रिकाम्या बाटल्या, इलेक्ट्रिक मोटार, झाकण सील करण्याचे साहित्य, स्टिकर्स तसेच दारू निर्मितीसाठी लागणारे विविध साहित्य जप्त केले.
जप्त मुद्देमालामध्ये ४३५ लिटर स्पिरिट, २२ हजार रिकाम्या बाटल्या, ९० एमएलच्या हजारो बाटल्या, इलेक्ट्रिक मोटार तसेच अन्य साहित्याचा समावेश आहे. पोलिसांनी संपूर्ण कारखाना उद्ध्वस्त करून साहित्य ताब्यात घेतले.
या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताचा शोध सुरू आहे.सदरची कामगिरी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी, विश्वजित जाधव यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी,पीएसआय. सुरेश सोनवणे, दिपक कुशारे आणि पोलीस अंमलदार रविंद्र आखडमल, अतुल पाटील, सुनिल जावरे, पोकॉ योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोद अखडमल, मनोज दाभाडे, मनोज महाजन, सचिन वाघ, आरीफ तडवी, सोमा ठाकरे, शांतीलाल पावरा, सुशिल पाटील, प्रशांत पवार, भटु साळुंके, मपोकॉ. अनिता पावरा, स्वाती शहा, चापोकॉ.विजय पाटील, होमगार्ड मिथुन पावरा, सुनिल पावरा व लखन भोई आदींनी केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!