शिरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई; बनावट देशी दारू ‘टँगो पंच’ कारखाना उद्ध्वस्त  //  तालुक्यात बनावट देशीदारूचा मिनी कारखाना उद्ध्वस्त,रा.उ.शु.विभागाची धडक कारवाई; मुख्य संशयित फरार  //  ‘महसूल आपल्या दारी’; दहिवद येथे समाधान शिबिर यशस्वी,८०० लाभार्थ्यांनी घेतला लाभ  //  आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला; तरुणावर कोयत्याने हल्ला  //  बोराडीत ग्रामदैवताच्या रथाला आग लावण्याचा प्रयत्न; ग्रामस्थांमध्ये संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी  //  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून शिरपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी १४.०८ कोटींचा निधी मंजूर  //  चांदसूर्या येथे अवैध मद्यनिर्मितीवर पोलिसांचा छापा; १.७७ लाखांचा साठा जप्त  //  आर.सी.पटेल उर्दू विद्यालयात सामाजिक समता सप्ताह उत्साहात  //  शिरपूर फर्स्टची 23 मेपासून तालुकाभर ‘जनसंघर्ष यात्रा’  //  कर्मवीर पूर्वभरती सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे घवघवीत यशपोलिस व सैन्य भरतीत ७ प्रशिक्षणार्थींची यशस्वी निवड

तालुक्यात बनावट देशीदारूचा मिनी कारखाना उद्ध्वस्त,रा.उ.शु.विभागाची धडक कारवाई; मुख्य संशयित फरार

शिरपूर : तालुक्यातील न्यू बोराडी ग्रामपंचायत हद्दीतील जामन्यापाडा शिवारात सुरू असलेला बनावट देशीदारू निर्मितीचा मिनी कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत उद्ध्वस्त केला. या कारवाईत तब्बल ८ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यनिर्मिती आणि तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत निरीक्षक देविदास नेहूल यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार न्यू बोराडी येथील जामन्यापाडा परिसरात छापा टाकण्यात आला. पथकाने मच्छिंद्र तारासिंग पावरा यांच्या झोपडीवजा घराजवळ सुरू असलेल्या बनावट देशीदारू निर्मितीच्या ठिकाणी धाड टाकली असता मोठ्या प्रमाणात साहित्य आणि तयार मद्यसाठा आढळून आला.
कारवाईदरम्यान ९० मिलीच्या ३०० सीलबंद बाटल्या, ४५० लिटर तयार बनावट देशीदारू, ५०० लिटर स्पिरीट, १२ हजार रिकाम्या बाटल्या, ५ हजार बुचे, रिकामे खोके, प्लास्टिक ट्रे, कॅप सीलिंग मशीन तसेच बोलेरो पिकअप वाहन असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचताच संशयित राजेश पावरा व त्याचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेत फरार झाले. याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार संशयितांसह साहित्य पुरवठादारांचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ही कारवाई निरीक्षक देविदास नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली जवान काशिनाथ गोसावी, प्रतीकेश भामरे, चालक रविंद्र देसले तसेच हाडाखेड सीमा तपासणी नाक्याचे दुय्यम निरीक्षक मुकेश पाटील, संतोष निकम, एम. पी. म्हस्के, हेमंत पाटील आणि चालक निलेश मोरे यांच्या पथकाने केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!