पत्नीसमोर अपमानाचा राग; मुलाकडून आई-वडिलांची निर्घृण हत्या; शमुलगा पोलिसांच्या ताब्यात  //  बबळाजमध्ये महसूल प्रशासन थेट जनतेच्या दारी; 650 लाभार्थ्यांनी घेतला योजनांचा लाभ  //  गधडदेवच्या बनावट दारू प्रकरणातील मुख्य संशयित फरार;विभागाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह  //  तालुक्यातील गधडदेव शिवारात बनावट देशीदारूचा कारखाना उद्धवस्त; लाखोंचा मुद्देमाल जप्त,  //  शिरपूर तहसीलच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक,बोराडीत महसूल शिबिरातून 600 नागरिकांना लाभ  //  जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचा शिरपूर दौरा; पोलीस ठाण्यांची पाहणी,अधिक प्रभावी कामकाजाच्या सूचना  //  पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक ७ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात  //  मुकेश आर. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश, गुणवंतांचा गुणगौरव   //  शिरपूरच्या भाजीपाला मार्केटमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला  //  एटीएम कार्डची अदलाबदल करून वृद्धाच्या खात्यातून २२ हजारांची फसवणूक

पत्नीसमोर अपमानाचा राग; मुलाकडून आई-वडिलांची निर्घृण हत्या; शमुलगा पोलिसांच्या ताब्यात

शिरपूर (प्रतिनिधी) : शहरातील मांडळ शिवारातील चंद्रमौली नगर परिसरात शुक्रवारी दुपारी मुलानेच आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गंगा महतो (५०) व रंजू देवी महतो (४२, मूळ बिहार) अशी मृतांची नावे आहेत. चंदन महतो या त्यांच्या एकुलत्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महतो कुटुंबीय नुकतेच बिहारमधील मुलीच्या विवाहासाठी गेले होते. शुक्रवारी सकाळी ते शिरपूरला परतले. दुपारी सुमारे २ वाजता चंदनने संतापाच्या भरात घरातील मुसळाने आई-वडिलांच्या डोक्यावर वार केले. दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
पत्नीसमोर आई-वडिलांनी अपमानास्पद बोलल्याचा राग मनात धरून चंदनने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजित जाधव व पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेतली.गुन्ह्या दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!