गधडदेवच्या बनावट दारू प्रकरणातील मुख्य संशयित फरार;विभागाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह  //  तालुक्यातील गधडदेव शिवारात बनावट देशीदारूचा कारखाना उद्धवस्त; लाखोंचा मुद्देमाल जप्त,  //  शिरपूर तहसीलच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक,बोराडीत महसूल शिबिरातून 600 नागरिकांना लाभ  //  जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचा शिरपूर दौरा; पोलीस ठाण्यांची पाहणी,अधिक प्रभावी कामकाजाच्या सूचना  //  पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक ७ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात  //  मुकेश आर. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश, गुणवंतांचा गुणगौरव   //  शिरपूरच्या भाजीपाला मार्केटमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला  //  एटीएम कार्डची अदलाबदल करून वृद्धाच्या खात्यातून २२ हजारांची फसवणूक  //  प्लायवूडने भरलेला ट्रक भीषण आग,ट्रक जळून खाक,हाडाखेडजवळ अपघात  //  खेळातील दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन,किसान विद्या प्रसारक संस्थेत खेळाडूंसाठी विशेष सत्र; स्पोर्ट्स फिजिओलॉजिस्ट डॉ. विशाल वाल्हे यांचे मार्गदर्शन

गधडदेवच्या बनावट दारू प्रकरणातील मुख्य संशयित फरार;विभागाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

शिरपूर /-तालुक्यात गधडदेव शिवारात बनावट देशीदारूचा कारखाना उद्ध्वस्त करून अटक केलेल्या तिघांपैकी एक संशयिताने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यातूनच पलायन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. लघवीला जाण्याचा बहाणा करून संशयिताने कार्यालयाच्या कंपाऊंडवरून उडी मारत अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. या घटनेमुळे उत्पादन शुल्क विभागाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने १३ मे रोजी गधडदेव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अंबाडुकपाडा शिवारात कोडीद-रामपूर रस्त्यालगतच्या झोपडीत बनावट देशीदारूचा कारखान्यावर छापा टाकत लाखो रुपये किमतीचा मुद्देमालासह संशयित अजयसिंग उजयसिंग उखळदे (२६), मनोहर हिरालाल पिंपळदे (२४) आणि मोगा शिवाजी मुसळदे (२७) यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करून तिघांना न्यायालयात हजर केले असता १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.संशयितांना
हाडाखेड नाक्यावरून रात्री साडेअकराच्या सुमारास पळासनेर येथील नवीन लॉकअपकडे नेले जात होते.दरम्यान मोगा मुसळदे याने लघवीला जाण्याची विनंती केली. परवानगी मिळताच त्याने कार्यालयाच्या मागील बाजूच्या कंपाऊंडवरून उडी मारली आणि अंधार व झाडाझुडपांचा फायदा घेत फरार झाला.जवानांनी पाठलाग केला; मात्र संशयित फरार झाला. या घटनेनंतर विभागात एकच खळबळ उडाली असून फरार संशयिताविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ कोळी करीत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा

खेळातील दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन,किसान विद्या प्रसारक संस्थेत खेळाडूंसाठी विशेष सत्र; स्पोर्ट्स फिजिओलॉजिस्ट डॉ. विशाल वाल्हे यांचे मार्गदर्शन

पुढे वाचा »
error: Content is protected !!