तालुक्यातील गधडदेव शिवारात बनावट देशीदारूचा कारखाना उद्धवस्त; लाखोंचा मुद्देमाल जप्त,  //  शिरपूर तहसीलच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक,बोराडीत महसूल शिबिरातून 600 नागरिकांना लाभ  //  जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचा शिरपूर दौरा; पोलीस ठाण्यांची पाहणी,अधिक प्रभावी कामकाजाच्या सूचना  //  पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक ७ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात  //  मुकेश आर. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश, गुणवंतांचा गुणगौरव   //  शिरपूरच्या भाजीपाला मार्केटमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला  //  एटीएम कार्डची अदलाबदल करून वृद्धाच्या खात्यातून २२ हजारांची फसवणूक  //  प्लायवूडने भरलेला ट्रक भीषण आग,ट्रक जळून खाक,हाडाखेडजवळ अपघात  //  खेळातील दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन,किसान विद्या प्रसारक संस्थेत खेळाडूंसाठी विशेष सत्र; स्पोर्ट्स फिजिओलॉजिस्ट डॉ. विशाल वाल्हे यांचे मार्गदर्शन  //  15 वर्षाखालील मुलींच्या धुळे जिल्हा क्रिकेट संघासाठी निवड चाचणीचे आयोजन 

तालुक्यातील गधडदेव शिवारात बनावट देशीदारूचा कारखाना उद्धवस्त; लाखोंचा मुद्देमाल जप्त,

शिरपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने तालुक्यातील गधडदेव शिवारात बनावट देशीदारू तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून तब्बल ७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला कोडीद-रामपूर रस्त्यालगत कुडाच्या झोपडीत बनावट देशीदारू तयार होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक देविदास नेहूल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला.
कारवाईदरम्यान ९० मिलीच्या देशीदारूच्या ५१ बॉक्स, १०० लिटर तयार बनावट देशीदारू, ५०० लिटर शुद्ध स्पिरीट, १८ हजार रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, बनावट दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अजयसिंग उजयसिंग उखडे (वय २६), मनोहर हिरालाल पिंपळदे (वय २४) आणि मोंगा शिवाजी मुसळदे (वय २७, तिघेही रा. सुलतानपूर, ता. शहादा) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांना शिरपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
ही कारवाई दुय्यम निरीक्षक संतोष निकम, एम. डी. पाटील, जवान काशिनाथ गोसावी, प्रतीक्षा भामरे, केतन जाधव, हेमंत पाटील तसेच वाहनचालक रवींद्र देसले आणि निलेश मोरे यांच्या पथकाने केली. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा

खेळातील दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन,किसान विद्या प्रसारक संस्थेत खेळाडूंसाठी विशेष सत्र; स्पोर्ट्स फिजिओलॉजिस्ट डॉ. विशाल वाल्हे यांचे मार्गदर्शन

पुढे वाचा »
error: Content is protected !!