तालुक्यातील गधडदेव शिवारात बनावट देशीदारूचा कारखाना उद्धवस्त; लाखोंचा मुद्देमाल जप्त,  //  शिरपूर तहसीलच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक,बोराडीत महसूल शिबिरातून 600 नागरिकांना लाभ  //  जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचा शिरपूर दौरा; पोलीस ठाण्यांची पाहणी,अधिक प्रभावी कामकाजाच्या सूचना  //  पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक ७ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात  //  मुकेश आर. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश, गुणवंतांचा गुणगौरव   //  शिरपूरच्या भाजीपाला मार्केटमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला  //  एटीएम कार्डची अदलाबदल करून वृद्धाच्या खात्यातून २२ हजारांची फसवणूक  //  प्लायवूडने भरलेला ट्रक भीषण आग,ट्रक जळून खाक,हाडाखेडजवळ अपघात  //  खेळातील दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन,किसान विद्या प्रसारक संस्थेत खेळाडूंसाठी विशेष सत्र; स्पोर्ट्स फिजिओलॉजिस्ट डॉ. विशाल वाल्हे यांचे मार्गदर्शन  //  15 वर्षाखालील मुलींच्या धुळे जिल्हा क्रिकेट संघासाठी निवड चाचणीचे आयोजन 

जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचा शिरपूर दौरा; पोलीस ठाण्यांची पाहणी,अधिक प्रभावी कामकाजाच्या सूचना

शिरपूर, ता. १३ : धुळे जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी बुधवारी शिरपूर तालुक्याचा दौरा करून शिरपूर शहर, शिरपूर तालुका, सांगवी आणि थाळनेर पोलीस ठाण्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.
माजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या बदलीनंतर विशाल आनंद यांनी ४ मे रोजी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच शिंदखेडा व शिरपूर तालुक्याचा दौरा केला.
दुपारी सुमारे अडीच वाजता त्यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यास भेट दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव आणि पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षकांनी सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, गुन्हे शाखा, लॉकअप, डीबी रूम, बिट रूम तसेच अधिकारी कक्षाची पाहणी केली. तसेच पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेत विविध नोंदी, प्रलंबित तपास आणि प्रशासकीय बाबींची माहिती घेतली.
दौऱ्याच्या प्रारंभी पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षकांचे स्वागत केले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सलामी देऊन त्यांचे स्वागत केले.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पोलीस दलाने शिस्तबद्ध, तत्पर आणि जनतेशी संवेदनशील राहून काम करण्याच्या सूचना दिल्या. कायदा व सुव्यवस्था राखताना नागरिकांचा विश्वास संपादन करण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा

खेळातील दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन,किसान विद्या प्रसारक संस्थेत खेळाडूंसाठी विशेष सत्र; स्पोर्ट्स फिजिओलॉजिस्ट डॉ. विशाल वाल्हे यांचे मार्गदर्शन

पुढे वाचा »
error: Content is protected !!