पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक ७ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात  //  मुकेश आर. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश, गुणवंतांचा गुणगौरव   //  शिरपूरच्या भाजीपाला मार्केटमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला  //  एटीएम कार्डची अदलाबदल करून वृद्धाच्या खात्यातून २२ हजारांची फसवणूक  //  प्लायवूडने भरलेला ट्रक भीषण आग,ट्रक जळून खाक,हाडाखेडजवळ अपघात  //  खेळातील दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन,किसान विद्या प्रसारक संस्थेत खेळाडूंसाठी विशेष सत्र; स्पोर्ट्स फिजिओलॉजिस्ट डॉ. विशाल वाल्हे यांचे मार्गदर्शन  //  15 वर्षाखालील मुलींच्या धुळे जिल्हा क्रिकेट संघासाठी निवड चाचणीचे आयोजन   //  शहादा रस्त्यावर भीषण अपघात; कारचालकाचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी  //  शॉर्टसर्किटमुळे मका पीक जळून खाक; भाटपुरा येथील शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान  //  ऑल इंडिया ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या विभागीय प्रभारी अध्यक्षपदी राजेंद्र भंडारी निवड

शिरपूरच्या भाजीपाला मार्केटमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

शिरपूर /- शहरातील खंडेराव मंदिरालगत असलेल्या भाजीपाला मार्केटमध्ये अंदाजे 40 ते 45 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, 11 मे रोजी रात्री सुमारे 9.15 वाजेच्या सुमारास भाजीपाला मार्केट परिसरात एक अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल चेतन सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सदर व्यक्तीस खाजगी वाहनाच्या मदतीने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती रात्री सुमारे 9.30 वाजता त्यांना मृत घोषित केले.
मृत व्यक्तीचे नाव, गाव व इतर ओळख पटलेली नसून त्याचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे असल्याचे सांगण्यात आले. तीव्र उष्म्यामुळे मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील वॉर्डबॉय यांच्या खबरीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र ओळख पटू न शकल्याने पोलिसांनी मृतदेहाची नियमानुसार विल्हेवाट लावली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा

खेळातील दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन,किसान विद्या प्रसारक संस्थेत खेळाडूंसाठी विशेष सत्र; स्पोर्ट्स फिजिओलॉजिस्ट डॉ. विशाल वाल्हे यांचे मार्गदर्शन

पुढे वाचा »
error: Content is protected !!