शिरपूरात अवैध सावकारी प्रकरण तापले ; तिघांविरोधात गुन्हा दाखल  //  शिरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई; बनावट देशी दारू ‘टँगो पंच’ कारखाना उद्ध्वस्त  //  तालुक्यात बनावट देशीदारूचा मिनी कारखाना उद्ध्वस्त,रा.उ.शु.विभागाची धडक कारवाई; मुख्य संशयित फरार  //  ‘महसूल आपल्या दारी’; दहिवद येथे समाधान शिबिर यशस्वी,८०० लाभार्थ्यांनी घेतला लाभ  //  आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला; तरुणावर कोयत्याने हल्ला  //  बोराडीत ग्रामदैवताच्या रथाला आग लावण्याचा प्रयत्न; ग्रामस्थांमध्ये संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी  //  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून शिरपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी १४.०८ कोटींचा निधी मंजूर  //  चांदसूर्या येथे अवैध मद्यनिर्मितीवर पोलिसांचा छापा; १.७७ लाखांचा साठा जप्त  //  आर.सी.पटेल उर्दू विद्यालयात सामाजिक समता सप्ताह उत्साहात  //  शिरपूर फर्स्टची 23 मेपासून तालुकाभर ‘जनसंघर्ष यात्रा’

शिरपूरात अवैध सावकारी प्रकरण तापले ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

शिरपूर शहरातील अवैध सावकारी प्रकरणात सहकार विभागाने मोठी कारवाई करत तिघांविरोधात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत फिर्याद दाखल केली आहे. सुरेश रामचंद्र माळी, नारायण जगन्नाथ मराठे व दिलीप बापू पाटील अशी संबंधितांची नावे असून, गरजूंना अवाजवी व्याजाने पैसे देऊन आर्थिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
या प्रकरणी कदीर अहमद हमीद शेख, रा. मदिना मोहल्ला, शिरपूर यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे तक्रार केली होती. तक्रारीत संबंधित तिघे विनापरवाना सावकारी व्यवसाय करत असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच व्याजाच्या बदल्यात नागरिकांच्या जमिनी, घरे व दुकाने हस्तगत केल्याचाही आरोप करण्यात आला होता.
तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे यांच्या आदेशानुसार विशेष पथके नियुक्त करण्यात आली. पोलिस बंदोबस्तात १४ ऑक्टोबर २०२५ रोजी तिघांच्या घरांवर झडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान सुरेश माळी यांच्या घरातून अवैध सावकारीसंदर्भातील ११ दस्तऐवज, नोंदवह्या व तक्रारदाराच्या नावाचे सहा कोरे धनादेश जप्त करण्यात आले. नारायण मराठे यांच्या घरातून नोंदवह्या, उसनवारी पावत्या, कोरे धनादेश तसेच सौदापावतीचे दस्तऐवज आढळून आले. दिलीप पाटील यांच्या घरातून थेट कागदपत्रे सापडली नसली तरी मराठे यांच्या घरातून मिळालेल्या सौदापावतीत त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे चौकशीत नमूद करण्यात आले आहे.
चौकशीदरम्यान तिन्ही जणांकडे सावकारी व्यवसायाचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच संबंधितांनी दिलेले खुलासे असमाधानकारक ठरवत तक्रारदाराने सादर केलेले पुरावे सक्षम असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
दरम्यान, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने एप्रिल २०२६ मध्ये संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार सहाय्यक निबंधक राजेंद्र विरकर यांनी सरकारतर्फे अधिकृत फिर्याद दाखल केली आहे.पुढील तपास पीएसआय सुरेश सोनवणे करीत आहे.

IMG_20260522_21092063
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!