शिरपूर : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे दि. 19 मे 2026 पासून 15 वर्षाखालील मुलींच्या आमंत्रित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत धुळे जिल्हा क्रिकेट संघ सहभागी होणार आहे.
त्या अनुंषगाने धुळे जिल्हा क्रिकेट संघाची निवड चाचणी आर. सी. पटेल फॉर्मसी महाविद्यालय मैदान, शिरपूर येथे दि. 14 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता आयोजित केली असून त्याच दिवशी संघाची निवड होणार आहे. दि. 1 सप्टेंबर 2011 ते दि. 31 ऑगस्ट 1014 या कालावधीमध्ये जन्मलेल्या खेळाडूनाच निवड शिबिरात सहभाग घेता येईल.तसेच निवड झालेल्या संघाचे सराव शिबिर लगेच दि. 15 ते 16 मे 2026 दरम्यान शिरपूर येथेच होणार असून दि. 16 मे 2026 रोजी संध्याकाळी संघ शिरपूर येथून स्पर्धेसाठी परस्पर रवाना होणार आहे.
तरी निवड चाचणीत सहभाग घेवू इच्छिणाऱ्या महिला क्रिकेटपटूंनी अधिक माहितीसाठी प्रशिक्षक पूजा जैन, (मो. 9607551305) यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
टिप : निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. क्रिकेटपटूंनी मुक्कामाची तयारी करुन यावे. आवश्यक ते कागदपत्रे सोबत ठेवावीत.तरी धुळे जिल्ह्यातील 15 वर्षाखालील खेळाडू मुलींनी जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभाग घ्यावा असे आवाहन धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व सल्लागार तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी केले आहे.
