15 वर्षाखालील मुलींच्या धुळे जिल्हा क्रिकेट संघासाठी निवड चाचणीचे आयोजन   //  शहादा रस्त्यावर भीषण अपघात; कारचालकाचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी  //  शॉर्टसर्किटमुळे मका पीक जळून खाक; भाटपुरा येथील शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान  //  ऑल इंडिया ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या विभागीय प्रभारी अध्यक्षपदी राजेंद्र भंडारी निवड  //  महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड २०२६ने एकनाथ सावळे यांचा गौरव  //  शिरपूर तहसील कार्यालयातील बनावट राजमुद्रा प्रकरण; तहसीलदारांच्या पत्रातून धक्कादायक खुलासे  //  आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलातील गुणवंतांचा गौरवदहावीच्या निकालात २१ शाखांचा शंभर टक्के निकाल; ९३६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण  //  आमदार कार्यालयात महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आ.पावरा यांच्यातर्फे अभिवादन  //  हायवेवरील बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा उलगडा; मध्य प्रदेशातील आरोपी अटकेत  //  शिरपूर तालुक्यात जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण

शॉर्टसर्किटमुळे मका पीक जळून खाक; भाटपुरा येथील शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

शिरपूर (प्रतिनिधी) : शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याचे कापणीसाठी तयार ठेवलेले मका पीक पूर्णपणे जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुमारे २०० क्विंटल मका, ठिबक सिंचनाच्या नळ्या आणि पीव्हीसी पाइप जळाल्याने अंदाजे सहा लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भाटपुरा येथील शेतकरी प्रवीण गुजर यांनी नाकडीबाई हसराज वजारी यांची साडेतीन बिगे जमीन गहाण तत्त्वावर घेतली होती. तसेच शेजारील गयास पिंजारी यांची साडेतीन बिगे जमीन बटाईने करून एकूण सात बिग्यांवर मका लागवड केली होती.
मका पीक पूर्णपणे तयार झाल्यानंतर त्यांनी कापणी करून कणसे शेतात साठवून ठेवली होती. काही दिवसांतच त्याची वाहतूक करून विक्री करण्याची तयारी सुरू होती. मात्र ९ मे रोजी अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शेतात आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत साठवून ठेवलेला संपूर्ण मका जळून खाक झाला.
या आगीत मका पिकासह ठिबक सिंचनाच्या नळ्या तसेच शेतासाठी आणलेले २५ ते ३० पीव्हीसी पाइपही नष्ट झाले. त्यामुळे केवळ यंदाच्या हंगामाचे नुकसान झाले नसून पुढील शेती हंगामावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे प्रवीण गुजर यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून योग्य ती आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!