शिरपुरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ  //  🚨शिक्का महसूलचा,नंबर पोलीस खात्याचा! 🚨 शिरपूर तहसील कार्यालयाचा मतीगुंग करणारा ‘POL’ महाघोटाळा!  //  इंटरनेट केबल तपासताना विजेचा शॉक; शिरपूरातील फोटोग्राफरचा मृत्यू  //  तीन गावठी पिस्टलांसह दोघांना केले जेरबंद; तालुका पोलिसांची धडक कारवाई  //  शिरपूर तहसील कार्यालयात ‘बनावट शिक्क्यांचा’ काळाबाजार?  //  गोवंशाची निर्दयी वाहतूक; शिरपूर शहर पोलिसांची 6 जनावरांची केली सुटका  //  विना हेल्मेट फिरणाऱ्या पोलिसांवर पोलिसांची धडक कारवाई  //  तालुक्यात एकाच रात्रीत चार घरफोड्या ; ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ  //  शिरपूरात अवैध सावकारी प्रकरण तापले ; तिघांविरोधात गुन्हा दाखल  //  शिरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई; बनावट देशी दारू ‘टँगो पंच’ कारखाना उद्ध्वस्त

शिरपुरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ

शिरपूर : शहरातील निमझरी नाका परिसरातील चक्रधर कॉलनी येथे एका ३० वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. राकेश भगवान बडगुजर (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राकेश बडगुजर हे आपल्या आई-वडिलांसोबत चक्रधर कॉलनी येथे राहत होते. शनिवारी रात्री कुटुंबीय झोपल्यानंतर रविवारी पहाटे सुमारे पाच वाजेच्या सुमारास आई संगीताबाई बडगुजर या राकेश यांना उठविण्यास गेल्या असता, त्यांनी घराच्या छतावरील लोखंडी कडीला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून पती भगवान बडगुजर यांना बोलावले.
कुटुंबीयांनी तातडीने साडी कापून राकेश यांना खाली उतरविले. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना त्वरित शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र रोकडे करीत आहे.

IMG_20260525_181256

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!