एटीएम कार्डची अदलाबदल करून वृद्धाच्या खात्यातून २२ हजारांची फसवणूक  //  प्लायवूडने भरलेला ट्रक भीषण आग,ट्रक जळून खाक,हाडाखेडजवळ अपघात  //  खेळातील दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन,किसान विद्या प्रसारक संस्थेत खेळाडूंसाठी विशेष सत्र; स्पोर्ट्स फिजिओलॉजिस्ट डॉ. विशाल वाल्हे यांचे मार्गदर्शन  //  15 वर्षाखालील मुलींच्या धुळे जिल्हा क्रिकेट संघासाठी निवड चाचणीचे आयोजन   //  शहादा रस्त्यावर भीषण अपघात; कारचालकाचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी  //  शॉर्टसर्किटमुळे मका पीक जळून खाक; भाटपुरा येथील शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान  //  ऑल इंडिया ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या विभागीय प्रभारी अध्यक्षपदी राजेंद्र भंडारी निवड  //  महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड २०२६ने एकनाथ सावळे यांचा गौरव  //  शिरपूर तहसील कार्यालयातील बनावट राजमुद्रा प्रकरण; तहसीलदारांच्या पत्रातून धक्कादायक खुलासे  //  आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलातील गुणवंतांचा गौरवदहावीच्या निकालात २१ शाखांचा शंभर टक्के निकाल; ९३६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण

एटीएम कार्डची अदलाबदल करून वृद्धाच्या खात्यातून २२ हजारांची फसवणूक

शिरपूर : एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका वृद्धाची दिशाभूल करून त्यांचे एटीएम कार्ड बदलत दोघा अज्ञात ठगांनी खात्यातील २२ हजार रुपये लंपास केल्याची घटना शिरपूर शहरात घडली. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून शिरपूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
शास्त्रीनगर परिसरातील दिनेश शांतीलाल राजपूत यांनी याप्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कर्जाच्या हप्त्याची रक्कम भरण्यासाठी रोख पैशांची गरज असल्याने ते बुधवारी दुपारी निमझरी नाक्याजवळील राम कॉम्प्लेक्समधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते.
एटीएममध्ये व्यवहार करत असताना दोन अनोळखी तरुणांनी मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी हातचलाखी करून त्यांनी राजपूत यांचे एटीएम कार्ड बदलून घेतले. कार्ड बदलल्याची बाब त्या वेळी राजपूत यांच्या लक्षात आली नाही.
यानंतर संबंधित ठगांनी शिरपूर बसस्थानकाजवळील दुसऱ्या एटीएम केंद्रात जाऊन राजपूत यांच्या कार्डचा वापर करून त्यांच्या खात्यातून २२ हजार रुपये काढून घेतले. मोबाईलवर व्यवहाराचा संदेश आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच राजपूत यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात दोन तरुणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून एटीएम केंद्रांतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, एटीएममध्ये व्यवहार करताना अनोळखी व्यक्तींची मदत घेऊ नये, कार्ड किंवा पिन क्रमांक कोणालाही सांगू नये आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने बँक व पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा

खेळातील दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन,किसान विद्या प्रसारक संस्थेत खेळाडूंसाठी विशेष सत्र; स्पोर्ट्स फिजिओलॉजिस्ट डॉ. विशाल वाल्हे यांचे मार्गदर्शन

पुढे वाचा »
error: Content is protected !!