प्लायवूडने भरलेला ट्रक भीषण आग,ट्रक जळून खाक,हाडाखेडजवळ अपघात  //  खेळातील दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन,किसान विद्या प्रसारक संस्थेत खेळाडूंसाठी विशेष सत्र; स्पोर्ट्स फिजिओलॉजिस्ट डॉ. विशाल वाल्हे यांचे मार्गदर्शन  //  15 वर्षाखालील मुलींच्या धुळे जिल्हा क्रिकेट संघासाठी निवड चाचणीचे आयोजन   //  शहादा रस्त्यावर भीषण अपघात; कारचालकाचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी  //  शॉर्टसर्किटमुळे मका पीक जळून खाक; भाटपुरा येथील शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान  //  ऑल इंडिया ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या विभागीय प्रभारी अध्यक्षपदी राजेंद्र भंडारी निवड  //  महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड २०२६ने एकनाथ सावळे यांचा गौरव  //  शिरपूर तहसील कार्यालयातील बनावट राजमुद्रा प्रकरण; तहसीलदारांच्या पत्रातून धक्कादायक खुलासे  //  आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलातील गुणवंतांचा गौरवदहावीच्या निकालात २१ शाखांचा शंभर टक्के निकाल; ९३६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण  //  आमदार कार्यालयात महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आ.पावरा यांच्यातर्फे अभिवादन

प्लायवूडने भरलेला ट्रक भीषण आग,ट्रक जळून खाक,हाडाखेडजवळ अपघात

शिरपूर | प्रतिनिधी
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड गावाजवळील गुरुद्वारासमोर प्लायवूडने भरलेल्या ट्रकला रविवारी (११ मे) दुपारी अचानक भीषण आग लागली. काही मिनिटांतच आगीने संपूर्ण ट्रकला वेढा घातल्याने वाहन पूर्णतः जळून खाक झाले. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच ट्रकमधून बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
माहितीनुसार, प्लायवूडची वाहतूक करणारा ट्रक मुंबईहून शिरपूरच्या दिशेने येत होता. दुपारी साडेअकराच्या सुमारास हाडाखेडजवळील गुरुद्वारासमोर ट्रकमधून अचानक धूर निघू लागला. चालकाने तत्काळ वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले आणि खाली उतरला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण ट्रकला वेढले.
ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात प्लायवूड असल्याने आग वेगाने पसरली. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, ट्रकसह सर्व माल जळून खाक झाला. अखेरीस वाहनाचा केवळ लोखंडी सांगाडा शिल्लक राहिला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. शिरपूर तालुका पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत ट्रक व मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात असून, शिरपूर तालुका पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा

खेळातील दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन,किसान विद्या प्रसारक संस्थेत खेळाडूंसाठी विशेष सत्र; स्पोर्ट्स फिजिओलॉजिस्ट डॉ. विशाल वाल्हे यांचे मार्गदर्शन

पुढे वाचा »
error: Content is protected !!