क्राइम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर शहरातील किराणा दुकान फोडून तेल, तांदूळ आणि डाळी चोरल्याच्या गुन्ह्यात शिरपूर पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मेन रोडवर मे.ताराचंद डागा अँड सन्स हे होलसेल किराणा दुकान १८ मेस रात्री फोडण्यात आले होते. चोरट्यांनी तेलाचे ८५ डबे, परिवार तेलाचे २५ बॉक्स, रुची वनस्पती ब्रँडचे ६ डबे, तूरडाळीचे ४० कट्टे, बासमती तांदळाचे १२ कट्टे असा मुद्देमाल चोरून नेला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना शहर पोलिसांना त्यात मालेगाव येथील वाहिद हसन, आसिफ टेलर, इम्रान कुरेशी, सय्यद हुसेन यांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यापैकी पोलिसांनी वाहिद हसन आणि आसिफ टेलर यांना अटक केली. त्यांनी जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे सदाशिव हिरामण पाटील यांच्याकडे हा माल ठेवला होता. तो जप्त करण्यात आला. संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याने पोलिसांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले.