क्राइम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर तालुक्यातील भोईटी गावाजवळ दोन कारमधून अफूची बोंडे तालुका पोलिसांनी जप्त केली. या कारवाईत कार आणि अफू मिळून दोन लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन संशयितांना अटक केली असून तिसऱ्याचा शोध सुरू आहे.
रोहिणी व भोईटी परिसर गांजाचे आगार म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असून आजवर कोट्यवधी रुपयांचा गांजा तेथून जप्त करण्यात आला आहे. त्यात आता अफूचीही भर पडली असून प्रशासनाला आतातरी जाग येईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अफूची तस्करी केली जात असल्याच्या माहितीवरून सांगवी पोलिसांनी २५ जुलैला दुपारी साडेबाराला सापळा रचून एक xuv कार व एक स्विफ्ट कार अशी दोन वाहने जप्त केली. त्यांच्यामधून एकूण ६३ किलो अफूची बोंडे भरलेल्या गोण्या जप्त करण्यात आल्या. संशयित पांचा सोनाराम व सुरेशकुमार गोपीचंद यांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी दिनेशकुमार फरार आहे. सर्व संशयित राजस्थानचे रहिवासी आहेत. पीएसआय सुनील वसावे तपास करीत आहेत.