२५ हजाराची लाच घेताना महिला तलाठ्यासह तिघे जाळ्यात

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

जुनी कालबाह्य नोंद कमी करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून रोजगार सेवक व खाजगी पंटरमार्फत ती स्वीकारताना महिला तलाठी व तिच्या साथीदारांना धुळे येथील लाचलचपत प्रतिबंधक शाखेने सापळा रचून अटक केली.

तक्रारदार यांचे वडील व इतर ०७ यांचे नांवे मौजे पाथरजे, ता. चाळीसगांव येथे वडीलोपार्जित शेतजमीन असुन सदर शेतजमीनीच्या ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात नजर गहाण घेणार कोंडु भावडु या नावाची जुनी कालबाहय नोंद कमी होणे करीता त्यांचे वडील श्री गणपत झबु पवार यांनी केलेला अर्ज घेवुन दि.०२.०७.२०२५ रोजी तलाठी मोमीन यांची त्यांचे चाळीसगांव येथील कार्यालयात जावुन भेट घेतली असता त्यांनी सदरचा अर्ज जमा करुन तलाठी मोमीन यांनी तक्रारदार यांना “तुमचे काम खुप मोठे आहे, मी तुमच्या गावातील वाडीलाल पवार याचेशी बोलुन त्याला पैशा बाबत सांगते, तुम्ही त्यांना भेटुन घ्या. त्यांनी सांगितल्या प्रमाणे पैसे त्यांच्याकडे दिल्यावर मी तुमचे काम करून देते, त्याशिवाय तुझे काम होणार नाही” असे सांगितल्याची तक्रारदार यांनी दि.०३.०७.२०२५ रोजी तकार दिली होती.

सदर तक्रारीची पडताळणी केली असता तलाठी मोमीन यांनी तक्रारदार यांना त्यांचे कामाबाबत त्यांचे गावातील रोजगार सेवक वाडीलाल पवार यांस भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे तकारदार यांनी रोजगार सेवक वाडीलाल पवार यांचेसह तलाठी मोमीन यांची भेट घेतली असता रोजगार सेवक वाडीलाल पवार यांनी तलाठी मोमीन यांना तक्रारदार यांच्या कामाचा आदेश काढायला किती खर्च येईल अशी विचारणा केली असता तलाठी मोमीन यांनी तुम्हाला चांगले माहित आहे, जसा वाटणीपत्राचा आदेश राहतो तसाच खर्च येईल असे सांगितले.

त्यानंतर दि.१४.०७.२०२५ रोजी पुन्हा तक्रारदार यांनी रोजगार सेवक वाडीलाल पवार यांचेसह तलाठी मोमीन यांची भेट घेतली असता तलाठी मोमीन यांनी त्यांना तक्रारदार यांच्या कामाबाबत उद्या सांगते वाडीलाल भाऊला बोलते असे सांगितले. तसेच दि. १७.०७.२०२५ रोजी तक्रारदार यांनी रोजगार सेवक वाडीलाल पवार यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना मोमीन मॅडम यांनी तक्रारदार यांचेकडुन त्यांचे काम करुन देण्यासाठी २५,०००/- रुपये घेणेबाबत सांगितले त्यावेळी रोजगार सेवक यांचेसोबत असलेले खाजगी इसम दादा बाबु जाधव यांनी तक्रारदार यांना लाच देण्यासाठी अपप्रेरणा देवुन प्रोत्साहित केले.

त्यानंतर दि.३०.०७.२०२५ रोजी सापळा कारवाई दरम्यान रोजगार सेवक वाडीलाल पवार यांनी तलाठी मोमीन यांचे चाळीसगांव येथील कार्यालयाबाहेर तक्रारदार यांचेकडुन २५,०००/-रुपये लाचेची रक्कम स्विकारुन सदर लाचेची रक्कम तलाठी मोमीन यांना देण्यासाठी जात असतांना त्यांना रंगेहात पकडण्यात येवुन त्यांचे विरुध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक श्री माधव रेडडी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, जगदिश बडगुजर यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!