क्राईम ब्लास्ट ब्यूरो
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटख्याची अवैध वाहतूक करणारा आयशर ट्रक सांगवी पोलिसांनी २० जुलैला जप्त केला.
या कारवाईत ट्रक ड्रायव्हरला अटक करण्यात आली असून गुटख्याची १५ हजार पाकिटे आणि ट्रक असा एकूण १८ लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुटख्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून पोलिसांनी हाडाखेड चेक पोस्टवर वाहनांची तपासणी सुरू केली. सायंकाळी सातला मध्य प्रदेशाकडून शिरपूरकडे येणारा आयशर ट्रक (एमपी ०९, डीजे ७४२४) थांबवून झडती घेतल्यावर त्यात राजू स्वीट सुपारी नामक गुटख्याची १५ हजार पाकिटे आढळली. पोलिसांनी ट्रकसह गुटखा जप्त करून ड्रायव्हर मिथुन अंतरसिंह बरिया याला अटक केली. अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक सुनील वसावे तपास करीत आहेत.