क्राईम ब्लास्ट ब्यूरो
किरकोळ भांडणातून मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील झेंडेअंजन गावात घडली असून संशयित युवकाला सांगवी पोलिसांनी अटक केली.
देविदास उर्फ देवा गुलाब बहिरम (रा.झेंडेअंजन) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचा सात जुलैला गावातील मित्र विकास विजय महाले याच्याशी वाद झाला होता. त्यातून महाले याने देविदासच्या डोक्यात दगड टाकला होता. गंभीर जखमी झाल्याने देविदासला धुळे येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला. सांगवी पोलिस ठाण्यात संशयित विकास महाले याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. पीआय जयपाल हिरे तपास करीत आहेत.