सावळदे येथील एटीएम फोडून जाळले

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून ते पेटवून दिल्याची खळबळजनक घटना चार जुलैच्या मध्यरात्री घडली.

संशयितांनी या घटनेत मोठ्या प्रमाणावर रोकड पळवून नेल्याची शक्यता असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे. सकाळी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, डीवायएसपी भागवत सोनवणे, निरीक्षक के.के.पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

शिरपूर-शिंदखेडा रस्त्यावर एसबीआयचे एटीएम आहे. त्याला आग लागल्याचा प्रकार पहाटे उघडकीस आला. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. त्यानंतर पाहणी केल्यावर आग लावण्यापूर्वी मशीन फोडून रक्कम पळवल्याचे आढळले. किती रक्कम चोरट्याने पळवली याबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही.

चोरट्यानी गॅस कटरच्या मदतीने एटीएम फोडल्याचा संशय असून त्यामुळेच मशीनला आग लागली असावी असा अंदाज आहे.

एक जुलैला शहरातील रसिकलाल पटेल नगरमधील एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र वेळीच इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी यंत्रणेने सावध केल्यामुळे चोरट्याना पळ काढावा लागला होता. हायवे जवळच्या भागात, रात्रीच्या अंधारात पकडले जाण्याची शक्यता अत्यंत तुरळक असल्याने सावळदे येथे चोरी यशस्वी झाल्याचे दिसून आले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!