आर.सी.पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालयाला विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात ‘अ’ श्रेणी  //  तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल व अस्तित्व सोशल वेलफेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य सप्ताह   //  शिरपुरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ  //  🚨शिक्का महसूलचा,नंबर पोलीस खात्याचा! 🚨 शिरपूर तहसील कार्यालयाचा मतीगुंग करणारा ‘POL’ महाघोटाळा!  //  इंटरनेट केबल तपासताना विजेचा शॉक; शिरपूरातील फोटोग्राफरचा मृत्यू  //  तीन गावठी पिस्टलांसह दोघांना केले जेरबंद; तालुका पोलिसांची धडक कारवाई  //  शिरपूर तहसील कार्यालयात ‘बनावट शिक्क्यांचा’ काळाबाजार?  //  गोवंशाची निर्दयी वाहतूक; शिरपूर शहर पोलिसांची 6 जनावरांची केली सुटका  //  विना हेल्मेट फिरणाऱ्या पोलिसांवर पोलिसांची धडक कारवाई  //  तालुक्यात एकाच रात्रीत चार घरफोड्या ; ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ

तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल व अस्तित्व सोशल वेलफेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य सप्ताह 

शिरपूर : एस.व्ही. के.एम. संचलित तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल व अस्तित्व सोशल वेलफेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य सप्ताह अतिशय सेवाभावी व अभिनव पद्धतीने संपन्न झाला.अस्तित्व सोशल वेलफेअर फाऊंडेशन च्या संचालिका सौ. द्वेता पटेल नथवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला.

IMG_20260526_211011

एस.व्ही.के.एम. संचलित तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर व अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. द्वेता पटेल नथवानी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २२ मे पासून मोफत आरोग्य सप्तानिमित्त विविध आरोग्य उपक्रम राबविण्यात आले.या अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील नोंदणीकृत १०० बालरुग्णांची तपासणी करण्यात येऊन ३४ बालकांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. यात हर्निया, हायड्रो सेल, अंनडिसेंडेड टेस्टीस, सर्कमसीजन, पॉलीडॅक्तीली, टंग टाय, सिस्ट्स व इतर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या. तसेच असंख्य क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप करण्यात आले. २५ व २६ मे या दोन दिवशी ४३४ ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करुन शिबिर यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले. यात सीबीसी, ब्लड ग्लुकोज, सिरम क्रिटीनीन, ईसीजी यासह विविध तपासणी मोफत करण्यात आल्या.या सामाजिक उपक्रमांमुळे गरजू रुग्ण, महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळत असून परिसरात उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आरोग्य शिबीर प्रसंगी आमदार काशिराम दादा पावरा, एस.व्ही.के.एम. सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या संचालिका सौ. कृतिबेन भूपेशभाई पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, हॉस्पिटल प्रकल्प संचालक जी. बी. गुजर हॉस्पिटल सीईओ डॉ. संतोष पवार, सर्व अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

IMG_20260526_211522

बाल रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी खास मुंबई येथून डॉ. संजय ओक (सिनियर कन्सल्टन्ट, बालरोग सर्जरी अँड कन्सलटिंग हॉस्पिटल डेव्हलपमेंट डायरेक्टर, मुंबई), डॉ. पारस कोठारी, डॉ. नम्रता कोठारी, डॉ. आदिती दळवी, डॉ. अलिश मेहता, डॉ. क्षितिजा पोखरकर, डॉ. श्वेता काणे, डॉ. मधुरा कोले, रुचिता शहा, प्रीती कदम यांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून बालरुग्णांना दिलासा दिला.तपनभाई हॉस्पिटलचे सर्व अधिकारी, कर्मचारी, अस्तित्व वेल्फेअर सोशल फाउंडेशन समन्वयक सोनिया भसीन, स्वीय सहाय्यक सुनील जैन, स्वीय सहाय्यक योगेश्वर माळी, संपूर्ण टीम, उपस्थित होते.

तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर येथे दि. २१ मे २०२६ रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत नाव नोंदणी केलेल्या १०० बालरुग्णांची फिजीकल फिटनेस तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर गरजू रुग्णांवर यशस्वी करण्यात आली. तसेच दि. २२ मे २०२६ रोजी १०० गरजूना वॉटर व्हील ड्रम (चल जलकुंभ) चे मोफत वाटप करण्यात आले. दि. २३ मे रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत नाव नोंदणी केलेल्या सुमारे १०० बालरुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी शस्त्रक्रिया झालेल्या बालरुग्णांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सदिच्छा भेट व वस्तू वाटप करण्यात आले.

खास बाब म्हणजे शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा, धुळे, साक्री, पिंपळनेर या तालुक्यातील क्षय (टी.बी.) रुग्णांना दि. २३ ते २७ मे २०२६ रोजी मोफत पोषण आहार किट वाटप होत आहे

IMG_20260526_211116
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!